लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या दीड महिन्यांपासून जिल्ह्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. या संकटातून बाहेर पडण्याआधीच जिल्ह्यावर पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. सुमारे दीड लाख लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तूर्तास जिल्ह्यात नऊ टँकर सुरू करण्यात आले असून १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. कोरोनाशी दोन हात करीत असताना जनतेला पाणी समस्येलाही तोंड द्यावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील १३२ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. यात महिलांची फरपट होत आहे.जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई दूर करण्यासाठी तूर्तास नऊ टँकर सुरू केले. त्यात पुसद तालुक्यातील लोहरा (खुर्द), लोहरा (ईजारा), बुटी (ई), आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर, पाळोदी, चिमटा, घाटंजीतील ससानी आणि यवतमाळ तालुक्यातील इचोरी व जांभुळणी येथे टँंकर सुरू करण्यात आले. गेल्या वर्षी १४ मेपर्यंत जिल्ह्यात २३ टँकर सुरू होते.याशिवाय प्रशासनाने १३२ गावांमध्ये १३२ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात आर्णी तालुक्यातील १९, महागाव ३९, घाटंजी चार, दिग्रस १६, पुसद २, उमरखेड ३०, वणी ३, यवतमाळ १३, दारव्हा १, केळापूर २ आणि झरी जामणी तालुक्यातील चार गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १९८ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. १३२ खासगी विहिरी अधिग्रहित करून एक लाख ३३ हजार २१८ नागरिकांची तहान भागविली जात आहे. टँकरद्वारे नऊ गावातील आठ हजार १४ लोकांना पाणी पुरविले जात आहे.महिलांना करावी लागते पायपीटपाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना पायपीट करावी लागत आहे. टँकर सुरू असलेल्या काही गावांमध्ये टँकरने विहिरीत पाणी सोडले जाते. विहिरीतून पाणी उपसण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडते. पुसद तालुक्यातील माळपठार पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. या परिसरातील लोहरा (खुर्द) येथे एकाच विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोना संसर्गाची भीती आहे.
जिल्हाभर पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 5:00 AM
गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या पावसाने नदी, नाले, प्रकल्प पूर्णपणे भरले नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.
ठळक मुद्देनऊ टँकर, २०० विहिरी : दीड लाख नागरिकांना चटके