शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

पुसद तालुक्यात नऊ टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 5:00 AM

गेल्या तीन - चार वर्षांपासून पावसात अनियमितता आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला विलंबाने पाऊस आला. त्यानंतर शेवटच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपर्यंत पाऊस झाला. यावर्षी शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस धरणात मे महिन्यात ३० टक्के जलसाठा होता. मात्र पालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने शहराला नियमित पाणीपुरवठा केला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही.

ठळक मुद्देपारा ४६ अंशावर : संख्या रोडावली, माळपठारावर टंचाई कायम

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहराचा पारा ४६ अंशावर पोहोचल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मात्र यंदाचा उन्हाळा सुसह्य ठरला असून यावर्षी केवळ ग्रामीण भागात नऊ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान तालुक्यात १३ टँकर सुरू होते.गेल्या तीन - चार वर्षांपासून पावसात अनियमितता आहे. गेल्या वर्षी सुरुवातीला विलंबाने पाऊस आला. त्यानंतर शेवटच्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपर्यंत पाऊस झाला. यावर्षी शहराची जीवनदायिनी असलेल्या पूस धरणात मे महिन्यात ३० टक्के जलसाठा होता. मात्र पालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने शहराला नियमित पाणीपुरवठा केला. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही. तथापि माळपठार परिसरातील फेट्रा पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने परिसरात नऊ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.यंदा कोरोनामुळे अनेक नागरिक परराज्य व परजिल्ह्यातून तालुक्यात परत आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही पाण्याचा वापर वाढला. त्यातच वारंवार हात धुण्यास सांगितले जात आहे.अशा परिस्थितीतही तालुक्यात यावर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवली नाही. तालुक्यातील छोटे, मध्यम प्रकल्प व पाझर तलावात जेमतेम पाणीसाठा होता. तरीही यंदा दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही.शहरातील बोअरही आटले नाहीयावर्षी शहरातील बोअरसुद्धा आटले नाही. शहरातील विहिरी व बोअरवेलला काही प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शहरात अडचण निर्माण झाली नाही. पारा ४६ अंशावर पोहोचला असतानाही पाणी पातळीत मोठी घट झाली नाही. नगराध्यक्ष अनिताताई नाईक, मुख्याधिकारी निर्मला राशीनकर, पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक बिघडू दिले नाही. परिणामी पुसदकरांना यंदा पाणी टंचाईची झळ पोहोचली नाही.

टॅग्स :Waterपाणी