शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

पावसाळ्यातही पाणीटंचाई

By admin | Published: June 24, 2017 12:39 AM

पावसाळा सुरू झाला तरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत शुक्रवारी पाणीटंचाईवरून रान पेटले.

जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक : घरकुल, शिक्षण, आरोग्यवर घमासान लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पावसाळा सुरू झाला तरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत शुक्रवारी पाणीटंचाईवरून रान पेटले. किमान पुढीलवर्षी तरी पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून कायमस्वरूपी योजना राबवाव्या, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. यात सुरूवातीलाच राम देवसरकरसह अन्य सदस्यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. विहीर अधिग्रहण, टँकरची संख्या कमी करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावे, अशी सूचना त्यांनी केली. महिला व बालकल्याण सभापती अरूणाताई खंडाळकर यांनी पावसाळा लागूनही अद्याप आरो बसले नाही, असा आरोप केला. शिवसेना सदस्यांनी दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाल्याचा आरोप केला. बैठकीत घरकुल, शौचालय बांधकाम, दलित वस्तीतील कामे आदींवर चर्चा झाली. घरकुलाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अद्याप केंद्राचा निधी आला नसल्याचे सांगितले. तूर्तास जिल्हा परिषदेकडे दीड कोटींचा निधी असून त्यातून केवळ बाराशे शौचालयांसाठी पैसे देऊ शकतो, असे स्पष्ट केले. यापुढे रस्ता बांधकामासाठी कंत्राटदाराने आयएसआय, बीबीसीएल, एचपी या कंपन्यांकडून डांबर खरेदी करण्याची अट निविदेत टाकण्याचा ठराव मंजूर झाला. एकाच रस्त्यावर दोन विभागाचे काम जिल्हा परिषद बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम या दोन विभागांनी २०१४-१५ मध्ये ६, तर २०१५-१६ मध्ये १२ रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले. हे सर्व रस्ते जिल्हा परिषदेचे आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष माधुरी आडे यांनी दिले. ६७ शाळांमधील अंशकालीन शिक्षकांना वेतन देण्याचा मुद्दाही उपस्थित झाला. गुजरी येथील संचमान्यतेचा मुद्दा जया पोटे यांनी उपस्थित केला. कायर येथील अनधिकृत गैरहजर वैद्यकीय अधिकाऱ्याला नोटीस बजावल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी सांगितले. पाटणबोरी येथील दलित वस्तीतील कामे दलित वस्तीत झालीच नसून यात सरपंच, ग्रामसेवक, शाखा अभियंता दोषी आढळल्याचे पंचायत विभागाचे प्रभारी डेप्युटी सीईओ आर. एम. भुयार यांनी सांगितले. तसेच अफरातफरीची तब्बल एक हजाराच्यावर प्रकरणे असल्याचे स्पष्ट केले.