लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळाला तातडीचा पर्याय म्हणून लगतच्या गोखी धरणावरून शहरातील प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकली गेली. परंतु वारंवार प्रयत्न करूनही आता कुठे जेमतेम यश मिळते आहे. तर दुसरीकडे गोधनी रोड स्थित जीवन प्राधिकरणाच्या आवारातील टाकीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी टँकरची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येकी ३५ हजार लिटर क्षमतेचे १२ टँकर शिर्डीवरून बोलाविण्यात येत आहे. त्याद्वारे गोखी धरणातून या टाकीपर्यंत पाणी आणले जाणार आहे. तूर्त दोन टँकर शहरात दाखल झाले.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारा चापडोह प्रकल्प कोरडा पडला. निळोणाही कोणत्याही क्षणी दगा देऊ शकतो. यामुळे शहराच्या ६० टक्के भागात भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने मोठ्या पाणी क्षमतेचे टँकर बोलाविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार १२ टँकर यवतमाळ शहरात येणार आहे. ३५ हजार लिटर क्षमता असलेले दोन टँकर बुधवारी यवतमाळात दाखल झाले आहे. या टँकरच्या माध्यमातून एमआयडीसी परिसरातील गोखी प्रकल्पाच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी उचलण्यात येईल. सदर पाणी जीवन प्राधिकरण कार्यालयातील आणि गोधनी क्षेत्रातील सममध्ये सोडले जाणार आहे. त्यानंतर पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून या पाण्याचे शहरात वितरण केले जाणार आहे.निळोणा धरणात खोदल्या बोअरवेलनिळोणा धरणाच्या क्षेत्रात तीन बोअरवेल खोदण्यात आल्या आहे. या बोअरवेलला मुबलक पाणी लागले असून तासी दहा हजार लिटर पाणी यातून उपसणे शक्य होणार आहे. या ठिकणावरूनही अधिक क्षमतेचे टँकर भरले जाणार आहे. तसेच निळोणा क्षेत्रात आणखी दोन बोअरवेल खोदण्यात येणार आहे.
गोखीवरून आता टँकरने आणणार टाकीपर्यंत पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:26 PM
बेंबळाला तातडीचा पर्याय म्हणून लगतच्या गोखी धरणावरून शहरातील प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईन टाकली गेली. परंतु वारंवार प्रयत्न करूनही आता कुठे जेमतेम यश मिळते आहे. तर दुसरीकडे गोधनी रोड स्थित जीवन प्राधिकरणाच्या आवारातील टाकीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी टँकरची मदत घेतली जाणार आहे.
ठळक मुद्देशिर्डीवरून बोलाविले १२ टँकर : प्रत्येकी ३५ हजार लिटर क्षमता