सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगर परिषदेत केंद्राच्या हरितपट्टा योजनेतून तब्बल २५ नवीन उद्याने तयार केली जात आहे. चार कोटी २५ लाख रुपये या उद्यानावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या उद्यानांचे काम अतिशय थातूरमातूर सुरू आहे. हरितपट्ट्यालाच वाळवी लागल्याचे चित्र दिसत आहे.यवतमाळ शहराचा विस्तार झाला. लगतच्या ग्रामपंचायतींचा पालिकेमध्ये समावेश करण्यात आला. यानंतर केंद्र शासनाकडून वाढीव भागासाठी निधी प्राप्त झाला आहे. हरितपट्ट्यांतर्गत ई-निविदा प्रक्रिया करून शहरात २५ नवीन उद्याने तयार केली जात आहे. यासाठी आर्थिक तरतूद असली तरी प्रत्यक्ष निधी मिळाला नाही. नियोजन विभागाकडे १५ लाखांंची जेमतेम शिल्लक असताना नव्या उद्यानाच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले. लातूर येथील हळकुडे एजंसी, आरआर कन्स्ट्रक्शन नागपूर व जगन्नाथ कन्स्ट्रक्शन यवतमाळ या तीन संस्था उद्यान निर्मितीचे काम करीत आहे. यामध्ये सर्व उद्यानाची किंमत ही दहा लाखांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उद्यानाची स्थिती पाहता तेथे दोन लाखांचेही काम झाल्यासारखे दिसत नाही.मंजूर २५ उद्यानापैकी १४ उद्यानाची कामे सुरु आहे. मात्र यावर पालिकेच्या तांत्रिक विभागाने असमाधानकारक प्रगती असा शेरा मारला आहे. तर उर्वरित ११ कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. एकंदरच उद्यान निर्मितीचा देखावा निवडणुकीच्या तोंडावर केला जात आहे. पर्याप्त निधी नसताना कार्यादेश देऊन कंत्राटदाराचे हित साधण्याचा प्रयत्न पालिकेच्या यंत्रणेने केला आहे.उद्याने आणि त्यांचे बजेटअमराई (वडगाव रोड) - १३ लाखप्रसादनगर - ९ लाख ६६ हजारआठवले ले-आऊट - १२ लाखतिरुपतीनगर लोहारा - १८ लाखबालाजी पार्क - ३९ लाखशिरे ले-आऊट - २४ लाखशर्मा ले-आऊट -१२ लाख २० हजारअलमासनगर - ९ लाखनवीन सव्वालाखे नगर - १२ लाखजुने सव्वालाखेनगर - १२ लाखमालाणी सोसायटी-९ लाख ५० हजारनिरोही ले-आऊट-१० लाख ३८ हजारगुरुकृपानगर - ८ लाख ३८ हजारउन्नती पार्क - १३ लाख ४१ हजारविदर्भ हाऊसिंग - ४ लाख ७१ हजारबालाजी पार्क - १६ लाख ८० हजारदेशमुख ले-आऊट-९ लाख ६० हजारचांदोरेनगर - २४ लाख ३७ हजारगणेशनगर - २४ लाखविकास आराखड्यातील साईट क्र. १८/१ - १६ लाख ९५ हजार
सव्वाचार कोटींच्या हरितपट्ट्याला वाळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 9:32 PM
नगर परिषदेत केंद्राच्या हरितपट्टा योजनेतून तब्बल २५ नवीन उद्याने तयार केली जात आहे. चार कोटी २५ लाख रुपये या उद्यानावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या उद्यानांचे काम अतिशय थातूरमातूर सुरू आहे. हरितपट्ट्यालाच वाळवी लागल्याचे चित्र दिसत आहे.
ठळक मुद्देयवतमाळ नगर परिषद : शहरातील २५ उद्यानांचे काम थातूरमातूर, १४ उद्यानांची असमाधानकारक स्थिती