शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

भारनियमनाचा मूर्तीकारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 9:50 PM

देशातील दुसºया क्रमांकाच्या दुर्गोत्सवाला तीन दिवसानंतर यवतमाळात प्रारंभ होत असून मूर्तीकारांना मात्र भारनियमनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देओलाव्यामुळे रंगकाम प्रभावित : ऐनवेळी आॅर्डर रद्द करण्याची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशातील दुसºया क्रमांकाच्या दुर्गोत्सवाला तीन दिवसानंतर यवतमाळात प्रारंभ होत असून मूर्तीकारांना मात्र भारनियमनाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. ढगाळी वातावरणामुळे मूर्ती सुकविण्यासाठी वेळ लागत आहे. त्यातच भारनियमनामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने मूर्तीकारांना अनेक आॅर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे.यवतमाळ शहर दुर्गोत्सवासाठी सज्ज झाले आहे. ठिकठिकाणी मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यवतमाळ शहरातील कलावंत मातेची मूर्ती घडविण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहेत. साक्षात देवी अवतरल्याचा भास व्हावा एवढ्या हुबेहुब मूर्ती यवतमाळातील कलावंत साकारतात. परंतु यावर्षी भारनियमनाचा फटका मूर्तीकारांना बसत आहे. किमान चार ते पाच तासाचे भारनियमन असल्याने मूर्ती सुकविण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यातच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हीटरच्या सहाय्याने मूर्ती सुकविण्याचे काम करीत आहे. तसेच मोठ्या मूर्तींना रंग काम करण्यासाठी क्रॉम्प्रेसरचा उपयोग केला जातो. परंंतु ही मशीनही भारनियमनामुळे चालविणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत अनेक मूर्तीकारांनी मूर्तीच्या आॅर्डर रद्द केल्या आहे.रोषणाई प्रभावितदुर्गोत्सवाच्या काळात संपूर्ण शहरावर रोषणाई केली जाते. मात्र यंदा भारनियमनाचा फटका रोषणाईलाही बसणार आहे. लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या रोषणाईचा आनंद यवतमाळकरांना घेताना अडचण जाणार आहे. या काळात भारनियमन नको अशी भाविकांची मागणी आहे.