शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
3
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
4
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
5
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
6
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
7
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
8
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
9
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
10
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
11
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
12
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
13
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
14
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
15
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
16
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
17
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
18
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
19
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण

खासदारांंचा शंभर दिवसात परफॉर्मन्स काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 6:00 AM

गेल्या शंभर दिवसात कुण्या खासदाराचा काय परफॉर्मन्स राहिला याबाबत जिल्हाभर चर्चा झडत आहे. त्यात चंद्रपूर व हिंगोलीच्या खासदारांबाबत मतदार काहीसे समाधानी दिसत आहेत. त्याच वेळी यवतमाळ-वाशिमच्या खासदारांचे फारसे दर्शनही नसल्याचा जनतेतील सूर आहे.

ठळक मुद्देहेमंत पाटील मतदारसंघात सक्रिय : धानोरकरांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी, मात्र भावनाताई आहेत कुठे ?

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्रातील भाजप सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण झाले. या शंभर दिवसात जिल्ह्यातील तीनही खासदारांचा परफॉर्मन्स काय? याची चर्चा मतदारांमध्ये होऊ लागली आहे. त्यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवळी नेमक्या आहेत कुठे ? याचीच चर्चा सर्वाधिक होताना दिसते आहे.गेल्या शंभर दिवसात कुण्या खासदाराचा काय परफॉर्मन्स राहिला याबाबत जिल्हाभर चर्चा झडत आहे. त्यात चंद्रपूर व हिंगोलीच्या खासदारांबाबत मतदार काहीसे समाधानी दिसत आहेत. त्याच वेळी यवतमाळ-वाशिमच्या खासदारांचे फारसे दर्शनही नसल्याचा जनतेतील सूर आहे. चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. आपल्या लोकसभा मतदारसंघातील वणी, आर्णीसह सहाही जागांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मी सूचवेल त्याला काँग्रेसने उमेदवारी द्यावी, या सहाही जागा निवडून आणण्याची जबाबदारी माझी, असा प्रस्ताव त्यांंनी पक्षश्रेष्ठींपुढे ठेवल्याची माहिती आहे. इकडे हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील हेसुद्धा जिल्ह्यातील आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महागाव, उमरखेड तालुक्यात सक्रीय आहेत. सेना कार्यकर्त्यांच्या जेवणावळी होताना दिसत आहेत. जनतेच्या प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिकाही घेतली आहे. मात्र या सर्वबाबींना खासदार भावनाताई गवळी जणू अपवाद ठरल्या आहेत.गेल्या शंभर दिवसात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौºयात नेर ते चिखलीपर्यंत उपस्थिती एवढेच काय ते तार्इंचे दर्शन शिवसैनिक व मतदारांना होऊ शकले. भावनातार्इंनी रिसोडपासून यवतमाळपर्यंतची आपली संपर्क कार्यालये बंद केली, निवडणुकीपर्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्तेही अचानक दूर केले, कार्यालय, मेस, चहा-पान सर्वच अचानक बंद झाल्याने कालपर्यंत त्यांच्यासाठी झटणारे शिवसैनिक बुचकाळ्यात पडले आहेत.तार्इंनी अचानक अशी टाळे ठोकण्याची भूमिका घेण्यामागे त्यांची पक्षश्रेष्ठींवरील नाराजी हे प्रमुख कारण असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगितले जाते. भावनाताई पाचव्यांदा शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेल्या. एकमेव महिला खासदार असूनही शिवसेनेकडून त्यांना मंत्री पदावर संधी दिली गेली नाही, हे त्यांच्या नाराजीचे प्रमुख कारण सांगितले जाते. शंभर दिवसात तार्इंचे जिल्ह्यात फारसे दर्शन झाले नाही. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच शिवसेनेला मतांची आघाडी देणाºया पुसद मतदारसंघातही ताई फिरकल्या नाहीत. त्यांंचा बहुतांश मुक्काम दिल्लीतच असल्याचे सांगण्यात येते. लगतच्या अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा सातत्याने संसदेत प्रश्न मांडताना दिसतात. मात्र दिल्लीत राहूनही भावनाताई सभागृहात प्रश्न मांडताना कधीच कशा झळकत नाहीत, याचे कोडे शिवसैनिकांना उलगडलेले नाही. ताई अलिकडे पक्षाच्या कार्यक्रमातही दिसत नाहीत, जिल्हा प्रमुख पदावरील अलिकडे पक्षश्रेष्ठींनी केलेला ‘जैसे थे’ बदल हे तर या गैरहजेरीमागील कारण नसावे ना असा शंकेचा सूर शिवसैनिकांच्या गोटातून ऐकायला मिळतो आहे. कालपर्यंत जीवाभावाचे वाटणाºया व एकजूट दाखविणाºया निकटवर्तीय कार्यकर्त्यांबाबत अचानक अविश्वासाचे वातावरण निर्माण होण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. त्यातूनच तार्इंच्या मागे एकजुटीने उभ्या राहिलेल्या शिवसैनिकांमध्येही आता फूट पडल्याचे चित्र आहे. त्यातील काही शिवसैनिक पक्षातील दुसºया गटाला जाऊन मिळाले आहेत. तार्इंकडे आता साधे रेल्वे आरक्षणासाठीचे पत्र मिळणेही दुरापास्त झाले आहे. दुसºया गटाशी विरोध घेऊन तार्इंच्या पाठीशी राहिलेले कार्यकर्ते सैरभैर झाले आहे.भाजपचे खुले आव्हान, तरीही शिवसेना मवाळविरोधी बाकावर असताना प्रचंड दहशत असलेल्या शिवसेनेची सत्तेत येताच आक्रमकता गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी वेळप्रसंगी सातही मतदारसंघात पक्षाचे आमदार निवडून आणू, असे खुले आव्हान दिले. मात्र त्यावर शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही किंवा आक्रमकरीत्या त्यावर पलटवार झाला नाही. गेल्या पाच वर्षात शिवसेनेने भाजपला कुठेच क्रॉस केल्याचे ऐकिवात नाही. शिवसेनेची ही मवाळ भूमिका पाहता आपल्या सत्तेतील वाट्याला धक्का लागू नये म्हणून शिवसेना नेत्यांनी भाजपसोबत सरसकट तडजोडीची भूमिका तर स्वीकारली नाही ना! अशी शंका व्यक्त केली जात आहे. सत्तेपुढे म्यान केलेल्या तलवारी गेल्या पाच वर्षात एकदाही शिवसेना नेत्यांनी भाजप विरोधात उपसल्याचे पहायला मिळाले नाही, हे विशेष.अन्य पक्षात एकच तर सेनेत तीन जिल्हा प्रमुखभाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्वच पक्षात संपूर्ण जिल्ह्याची धुरा एकाच अध्यक्षांकडे असताना शिवसेना मात्र याला अपवाद ठरली आहे. शिवसेनेला एक नव्हे तर तब्बल तीन जिल्हा प्रमुख देण्यात आले आहे. तिघांच्या दिशा वेगवेगळ्या असल्याने निष्ठावंत शिवसैनिकांची मात्र ‘नेमकी कुणाची कास धरावी’ याबाबत कोंडी होताना दिसते आहे. हे जिल्हा प्रमुख आपल्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित झाले आहेत.शिवसेनेला जागा वाढविण्याची संंधीजिल्ह्यात दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व अबाधित आहे. याशिवाय सत्तेत राहून सेनेने उमरखेड व वणीमध्ये भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. या जागांसाठी शिवसेनेने वाटाघाटीत आग्रह धरल्यास जिल्ह्यात सेना आमदारांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. याशिवाय युती कायम राहिली व ‘ठरल्याप्रमाणे’ पक्षांतर झाल्यास पुसदची जागाही सेनेच्या पारड्यात जाऊ शकते. मात्र जिल्ह्यातील शिवसेना नेते तिकीटांसाठी पक्षश्रेष्ठी आणि भाजपपुढे आपली बाजू किती आक्रमकपणे मांडतात, यावर सर्वकाही अवलंबून आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाShiv Senaशिवसेना