आॅनलाईन लोकमतयवतमाळ : विधीमंडळाच्या कोणत्याही समितीचा दौरा निश्चित झाल्यानंतर तो वारंवर लांबणीवर टाकला जात आहे. यामागे नेमके गुपीत काय, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.विधीमंडळाची अनुसूचित जमाती समिती आणि पंचायत राज समितीचा जिल्हा दौरा निश्चित झाला होता. पंचायत राज समितीचा दौरा तर मागील वर्षभरापासून लांबणीवर पडला आहे. मागीलवर्षीच ही समिती जिल्ह्यात दाखल होणार होती. मात्र नंतर समितीचा दौरा लांबणीवर टाकण्यात आला. त्यानंतर समितीने सुधारित दौरा कार्यक्रम पाठविला. तो दौराही रद्द करण्यात आला. आता फेब्रुवारीत ही समिती जिल्हा दौºयावर येणार होती. मात्र अर्धा फेब्रुवारी उलटून गेला तरी समितीने दौºयाची रूपरेषा अथवा तारीख निश्चित केली नाही.अनुसूचित जमाती समितीने १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यानचा दौरा कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना पाठविला होता. मात्र या समितीने आता आपला दौरा लांबणीवर टाकला. सर्व विभागांना नुकतेच तसे पत्र आले. त्यात केवळ १५ ते १७ फेब्रुवारीचा जिल्हा दौरा तूर्तास स्थगीत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र समिती जिल्हा दौºयावर कधी येणार, याबाबत कोणताही उल्लेख नाही.या समित्या वारंवार दौरा लांबणीवर टाकत असल्याने नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न निर्माण झाला. सध्या अधिवेशन सुरू नाही. त्यामुळे दौरा लांबणीवर टाकण्याचे प्रयोजन कुणालाच कळले नाही. यापूर्वी काही अधिकाºयांनी पीआरसीचा दौरा लांबणीवर टाकण्यासाठी धडपड केल्याची मात्र चर्चा रंगली होती.समिती सदस्य कुठे गुंतलेविधीमंडळाच्या समितीत दोन्ही सभागृहातील आमदारांचा समावेश असतो. त्यांच्या सवडीनेच समितीचा दौरा निश्चित केला जातो. मात्र दौरा लांबणीवर टाकला जात असल्याने हे आमदार कोणत्या कामात गुंतले आहेत, असा प्रश्न जनतेला पडला. समितीच्या दौºयामुळे जिल्ह्यातील अनेक समस्या मार्ग लागतात. अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपुरते का होईना, सरळमार्गी होतात. मात्र दौराच लांबणीवर पडत असल्याने सारेच आॅलवेल होत आहे.
दौरा लांबणीचे गुपित काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:02 PM
विधीमंडळाच्या कोणत्याही समितीचा दौरा निश्चित झाल्यानंतर तो वारंवर लांबणीवर टाकला जात आहे. यामागे नेमके गुपीत काय, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.
ठळक मुद्देविधिमंडळ समिती : एसटी समिती, पीआरसी समिती