शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जरा हटके; सफाई कर्मचारी जेव्हा मुख्याधिकारी बनला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 12:25 PM

घाटंजी नगरपालिकेतील. प्रदीप महिपाल बिसमोरे या कर्मचाऱ्याच्या कृतार्थ निवृत्तीची ही गोष्ट. ३० सप्टेंबरला ते ४० वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बिसमोरे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला. मात्र, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी बिसमोरे यांना आपल्या कक्षात नेऊन चक्क आपल्या खुर्चीवर बसवून त्यांचा सत्कार केला.

ठळक मुद्देस्वच्छतेच्या धडपडीचा असाही सन्मान ४० वर्षांच्या कष्टानंतर निवृत्त होता-होता पदग्रहण

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नालीमध्ये फावडे टाकून घाण ओढणे, रस्त्यावरचा केर काढणे, गावातल्या मृत जनावरांची विल्हेवाट लावणे... एवढे वाचूनही अनेकांनी नाकाला रुमाल लावले असतील. पण दररोज हीच कामे मन लावून करणारे सफाई कर्मचारी कसे जगत असतील? त्यांना दुर्गंध जीवघेणा वाटत नसेल का? त्यांनाही त्रास होतोच, पण ते गावाच्या स्वच्छतेसाठी दुर्गंधीचे, घाणीचे हलाहल स्वत:वर ओढवून घेतात. असाच एक कष्टिक सफाई कामगार सोमवारी चक्क मुख्याधिकारी बनला..!होय, ही गोष्ट आहे घाटंजी नगरपालिकेतील. प्रदीप महिपाल बिसमोरे या कर्मचाऱ्याच्या कृतार्थ निवृत्तीची ही गोष्ट. ३० सप्टेंबरला ते ४० वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत बिसमोरे यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला. मात्र, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी बिसमोरे यांना आपल्या कक्षात नेऊन चक्क आपल्या खुर्चीवर बसवून त्यांचा सत्कार केला. ‘आज तुम्ही एक दिवसाचे मुख्याधिकारी’ अशा शब्दात त्यांचा सन्मान केला. ज्या कार्यालयात आपण चतुर्थश्रेणीपेक्षाही खालच्या स्तरावरचे काम केले, त्याच कार्यालयात निवृत्तीच्या दिवशी सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा हा प्रसंग अनुभवताना बिसमोरे यांचे काळीज गहिवरून गेले.प्रत्येक महिन्यात दोघांचा सत्कारघाटंजी पालिकेत सफाई कामगारांच्या सन्मानाची अनोखी परंपरा निर्माण करण्यात आली आहे. दरमहिन्यात दोन कामगारांचा मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते सर्वांपुढे सत्कार केला जातो. यात एक महिला तर एक पुरुष कामगार निवडला जातो. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर्वत्र स्वच्छतेचा जागर होत असताना घाटंजीतील हा दैनंदिन उपक्रम लाखमोलाचा ठरणारा आहे.

प्रदीप बिसमोरे यांनी ४० वर्ष कुठलीही तक्रार न करता अखंडपणे शहर स्वच्छतेसाठी सेवा दिली. लोकांना अधिकारी म्हणून आम्ही दिसत असलो, तरी शहरासाठी झटणारे खरे हात या कामगारांचेच असतात. म्हणून निवृत्तीच्या दिवशी आम्ही त्यांना एक दिवसासाठी मुख्याधिकारी होण्याचा सन्मान बहाल केला. पालिकेतील वर्ग एक आणि दोनच्या कर्मचाऱ्यांना जेवढा सन्मान मिळतो, तेवढाच सन्मान सफाई कामगारांनाही मिळावा, हाच त्या मागचा हेतू आहे.- पृथ्वीराज पाटील,मुख्याधिकारी, घाटंजी

टॅग्स :Jara hatkeजरा हटके