शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

जिल्हा बँकेवर प्रशासक केव्हा?

By admin | Published: December 29, 2015 8:23 PM

संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला म्हणून अवघ्या महिनाभरातच अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (गोल बँक) प्रशासक बसविण्यात आला.

यवतमाळ : संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला म्हणून अवघ्या महिनाभरातच अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (गोल बँक) प्रशासक बसविण्यात आला. याउलट स्थगनादेशाचा आडोसा घेवून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ गेल्या तीन वर्षांपासून अतिरिक्त कारभार चालवित आहेत. या बँकेवर प्रशासक केव्हा बसणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. युती सरकारची वर्षपूर्ती होवूनही बँकेवरील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे कायम असलेले ‘प्रभारी’ संचालक मंडळ ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपाच्या पाचही आमदारांचे सपशेल अपयश मानले जात आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाची मुदत संपल्याने सोमवारी, २८ डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक श्रीमती एस.आर. डोंगरे यांना तेथे प्रशासक म्हणून नेमण्यात आले. अमरावतीतील या प्रशासकीय फेरबदलाने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनिष पाटील व संचालक मंडळाची मुदत डिसेंबर २०१२ मध्येच संपली. तेव्हापासून तेच संचालक मंडळ बँकेचा ‘अतिरिक्त कार्यभार’ पाहात आहेत. बँकेच्याच संजय जोशी या संचालकाच्या न्यायालयीन लढाईने संपूर्ण संचालक मंडळाला गेल्या तीन वर्षांपासून अतिरिक्त कार्यभार पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे. बँकेने नव्या रचनेत दुर्बल घटक हा मतदारसंघ गोठविला. त्याविरोधात संजय जोशी यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली व निवडणुकीला स्थगनादेश मिळविला. त्यावरून आता तीन वर्षे लोटत आहेत. मात्र स्थगनादेश कायम आहे आणि त्यावरील कारवाईही थंड बस्त्यात पडली आहे. केवळ ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. आता तर या केसची नेमकी तारीख काय, हे कुणालाही सांगता येणार नाही. कारण न्यायालयात याप्रकरणाकडे शासनाचेच दुर्लक्ष होते आहे. त्यात शासनातर्फे गेल्या तीन वर्षांपासून शपथपत्र व माहिती सादर केली गेली नाही. हीच बाब विद्यमान संचालक मंडळाच्या फायद्याची असल्याने त्यांनीही त्यासाठी आग्रह धरला नाही. उलट शपथपत्र दाखल करण्यास आणखी विलंब कसा लावता येईल, यासाठी सहकार आयुक्तालय व सहकार मंत्रालयात संचालकांनी पूर्वीपासूनच फिल्डींग लावलेली असल्याचे व ती युती शासनातही कायम असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस आघाडी सरकारमध्ये बँकेच्या संचालक मंडळाला जे जमले ते युती सरकारमध्ये जमणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता. युतीचे शासन येताच न्यायालयात शपथपत्र व आवश्यक माहिती सादर होईल आणि संजय जोशींना मिळालेला स्थगनादेश हटवून निवडणुका लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. ३१ आॅक्टोबरला भाजप-सेना युती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र शपथपत्र न्यायालयात दाखल झाले नाही. पर्यायाने संपूर्ण वर्षभर आघाडीच्या विचाराचे संचालक मंडळ कायम राहिले. युती शासन असूनही जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि भाजपाच्या पाचही आमदारांना बँकेवर ना प्रशासक बसविता आला, ना निवडणुका लावून घेता आल्या. त्या तुलनेत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपाचे आमदार वजनदार ठरल्याचे दिसून येते. बँकेबाबत भाजप-सेनेची मवाळ भूमिका पाहता यवतमाळ जिल्ह्यात सहकार क्षेत्रात युतीचे नेटवर्कच नसल्याचे सिद्ध होते. युती शासनात आघाडीचे संचालक मंडळ बँकेवर गेली वर्षभर शाबूत राहिल्याने भाजप-सेनेच्या सहकार क्षेत्रातील मर्यादा उघड झाल्या आहे. (जिल्हा प्रतिनिधी)