लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शिवशाहीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण होते. मात्र स्वातंत्र्यानंतर कोणतेही सण साजरे करतो म्हटले की पोलीस बंदोबस्त लागतोच. ज्या दिवशी पोलीस बंदोबस्ताशिवाय सण साजरे होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवशाही नांदेल, असे प्रतिपादन आमदार ख्वाजा बेग यांनी केले.ते घाटंजी येथील शिवजयंती उत्सवात ‘वीर राजे संभाजी पुरस्कार’ वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने हा पुरस्कार यंदा ‘प्रश्नचिन्ह’ फासेपारधी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष मतीन भोसले यांना आमदार ख्वाजा बेग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शिवतीर्थ 'जय भवानी, जय शिवाजी’च्या नाºयांनी दणाणून गेले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नयना ठाकूर होत्या. बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, डॉ. अरविंद भुरे, हरिष कुडे, जितेंद्र ठाकरे, सतीश भोयर, मधुसुदन चोपडे, चिराग शाह आदी उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना मतीन भोसले यांनी फासेपारधी समाजातील घटकावर होत असलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. आजही या समाजाच्या मनात पोलिसांचे भय कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवजयंती उत्सव समिती व यशस्विनी महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीने मतीन भोसले यांना आर्थिक स्वरूपात देणगी देण्यात आली. मतीन भोसलेसह त्यांचे सहकारी नामसिंग पवार, ओंकार पवार व त्यांचे विद्यार्थीही उपस्थित होते. यातील झारखंड येथील विद्यार्थिनीने ‘मुजरीम ना कहना मुझे लोगो, मुजरिम तो सारा जमाना है’ हे गीत सादर केल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश उदार तर आभार दीपक महाकुळकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजे छत्रपती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. शिवजयंती महोत्सवात भरगच्च कार्यक्रम आयोजित केले होते. शहरात शिवशाहीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस बंदोबस्ताविना सण होतील, तेव्हाच अवतरेल शिवशाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:14 PM
शिवशाहीत सर्वधर्मसमभावाचे वातावरण होते. मात्र स्वातंत्र्यानंतर कोणतेही सण साजरे करतो म्हटले की पोलीस बंदोबस्त लागतोच. ज्या दिवशी पोलीस बंदोबस्ताशिवाय सण साजरे होतील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने शिवशाही नांदेल, असे प्रतिपादन आमदार ख्वाजा बेग यांनी केले.
ठळक मुद्देवीर राजे संभाजी पुरस्कार मतीन भोसले यांना प्रदान