ई-क्लास अतिक्रमण : फलक लावण्यास मज्जाव दिग्रस : शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या तहसीलच्या पथकासमोर शेतकऱ्याने विळा तर तक्रारकर्त्याने कुशा काढला. या प्रकाराने त्या ठिकाणी गेलेल्या पथकाने तेथून पोबारा केल्याची घटना तालुक्यातील इसापूर येथे गुरुवारी दुपारी घडली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. इसापूर येथील ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण असल्याची तक्रार करीत श्याम गायकवाड याने काही महिन्यापूर्वी वीरूगिरी आणि त्यानंतर तहसीलच्या कक्षात स्वत:ला कोंडून घेऊन आंदोलन केले. तर न्यायालयाच्या आदेशाने शेतकरी भाऊसाहेब साळुंके ती जमीन कसत होते. दरम्यान काल पुन्हा शामने याबाबत तक्रार केली. त्यावरून दिग्रसचे नायब तहसीलदार प्रकाश खाटीक, विस्तार अधिकारी डी.जी. परांंडे, ग्रामसेवक रेणुका बावणे, तलाठी प्रणिश दुधे घटनास्थळावर गेले. त्यांनी ट्रॅक्टर काढण्यास सांगितले. तसेच ग्रामपंचायतीचा फलक आणा म्हटल्याबरोबर साळुंके आणि गायकवाड यांच्यात वाद होऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. फलक न लावताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणाहून पोबारा केला. याच घटनेची दिवसभर चर्चा होती. (प्रतिनिधी)श्यामची वीरूगिरीइसापूर येथील ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी श्याम गायकवाड या तरुणाने प्रशासनाला चांगलेच वेठीस धरले आहे. यापूर्वी त्याने पोलीस ठाण्याच्या टॉवरवर चढून वीरूगिरी केली होती. तर काही दिवसापूर्वी तहसीलदारांच्या कक्षात स्वत:ला कोंडून घेत विष घेतले होते.
विळा अन् कुशा निघताच अधिकाऱ्यांची भंबेरी
By admin | Published: January 08, 2016 3:13 AM