सूरज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ : महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला आळा बसावा, यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कायदे कठाेर करण्यात आले. मात्र, तरीही अत्याचाराच्या घटनांचा आलेख हा वाढतच चालला आहे. २०२३ मध्ये राज्यात महिला अत्याचाराचे ४७ हजार ३८१ गुन्हे घडले असून, त्याची नाेंद पाेलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यात बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, पतीसह नातेवाइकांकडून झालेले क्रूर कृत्य, विनयभंग, अनैतिक व्यापार आदींचा समावेश आहे. ही धक्कादायक आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालातून समाेर आली आहे.
जनजागृतीअभावी व बदनामीच्या भीतीने अत्याचार सहन केला जात होता. मात्र, वाढत्या जनजागृतीमुळे अल्पवयीन मुलींचे पालक व महिलादेखील तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. महिलांवर केवळ बाहेरच अत्याचार होतात, असे नाही तर घराच्या चौकटीतही महिला सुरक्षित नाहीत. नातेवाइकांकडून व पतीकडूनही अत्याचार केला जातो.
अशी आहे गुन्ह्यांची नाेंद गुन्हे २०२२ २०२३बलात्कार ७,०८४ ७,५२१अपहरण ९,२९७ ९,६९८हुंडाबळी १८० १६९पती व नातेवाईक ११,३६७ ११,२२६विनयभंग १६,०८३ १७,२८१अनैतिक व्यापार ६५ १७४इतर १,२५५ १,३१२