‘मोदी जबजब डरते है, ईडी को आगे करते है’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 05:00 AM2022-06-18T05:00:00+5:302022-06-18T05:00:13+5:30

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावून तासनतास बसवून ठेवले जात आहे. मोदी सरकारने राजकीय सुडापोटी ही कारवाई केली असून ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. कुठलेही प्रकरण अंगावर येत असेल तर ईडीला पुढे करून मोदी सरकार स्वत:चा बचाव करीत आहे. यातूनच ही कारवाई होत असल्याचा आरोप यावेळी करण्या आला. यानंतर निवेदन देण्यासाठी पायदळ मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना मधेच रोखण्यात आले. 

‘Whenever Modi is afraid, he takes ED forward’ | ‘मोदी जबजब डरते है, ईडी को आगे करते है’

‘मोदी जबजब डरते है, ईडी को आगे करते है’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्र सरकारने राजकीय सुडापोटी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू केली आहे. नॅशनल हेराॅल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत ‘मोदी जबजब डरते है, ईडी को आगे करते है’ अशा घोषणा देत जिल्हा काॅंग्रेसच्या वतीने शुक्रवारी महात्मा फुले चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना तिरंगा चौकात पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. 
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावून तासनतास बसवून ठेवले जात आहे. मोदी सरकारने राजकीय सुडापोटी ही कारवाई केली असून ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. कुठलेही प्रकरण अंगावर येत असेल तर ईडीला पुढे करून मोदी सरकार स्वत:चा बचाव करीत आहे. यातूनच ही कारवाई होत असल्याचा आरोप यावेळी करण्या आला. यानंतर निवेदन देण्यासाठी पायदळ मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना मधेच रोखण्यात आले. 
यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. सरते शेवटी आंदोलकांना अटक करण्यात आली.  काँग्रेसच्या आंदोलकांनी भाजप सरकारविरोधात नारेबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी केले. यावेळी माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, विजय खडसे, प्रकाश पाटील देवसरकर, विजयाताई धोटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, आरीज बेग, शहर अध्यक्ष चंदू चौधरी, प्रवीण देशमुख, महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना आवारी, प्रदेश सचिव जावेद अन्सारी आदींची उपस्थिती होती.

Web Title: ‘Whenever Modi is afraid, he takes ED forward’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.