लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सन २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला. मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. यामुळे जिल्हा बँकेने विमा कंपनीला पत्र पाठवून एकूण पात्र शेतकरी आणि त्यांची रक्कम किती आहे याची विचारणा केली आहे. प्रत्यक्षात कंपनीकडून कुठलेही उत्तर जिल्हा बँकेला मिळाले नाही. यामुळे शेतकºयांच्या शेकडो प्रश्नांची उत्तरे देताना बँकेच्या नाकीनऊ आले आहे.गतवर्षी जिल्हा बँकेच्या ८० हजार शेतकरी सभासदांनी १७ कोटी ६८ लाख रुपयांचा विमा उतरविला होता. ही रक्कम इफ्को टोकिओ कंपनीकडे वर्ग करण्यात आली होती. यासोबतच केंद्र आणि राज्याचा हिस्साही विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आला. आता कंपनीने विम्याची रक्कम थेट शेतकºयांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा केली आहे.प्रत्यक्षात कुठल्या पिकाला किती रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली, किती शेतकरी पात्र ठरले याची कुठलीही माहिती बँकेला दिली नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यातही ही रक्कम जमा झाली नाही. यामुळे शेतकरी आता बँकांना पीक विम्याची रक्कम का आली नाही म्हणून जाब विचारत आहे. या प्रश्नांचे उत्तर देताना बँकेच्या शाखेवर प्रचंड ताण येत आहे. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विमा उतरविणाºया कंपनीला किती लोकांचा विमा मंजूर झाला, त्याची रक्कम किती याची माहिती विचारली आहे. मात्र ही माहिती अद्यापही कंपनीने बँकेला कळविली नाही. यातून बँकेपुढे मोठ्या अडचणी आहे.१३ हजार प्रकरणात दुरुस्त्या करून पाठविल्यापीक विमा कंपनीने आतापर्यंत १३ हजार नावे दुरुस्त करून मागितले. यामध्ये खाते नंबर चुकणे, आधार नंबर नसणे, गावाचे नाव व मंडळ यातील तफावत अशा बाबींचा यामध्ये समावेश होता. या प्रकरणात सहा कोटी रुपयांचा विमा मंजूर केलेला आहे. ही माहिती दुरुस्त करून बँकेने विमा कंपनीला पाठविली. प्रत्यक्षात यातील तीन हजार शेतकऱ्यांनाच विमा रक्कम वळती झाली आहे. अजूनही इतर शेतकºयांची रक्कम मिळाली नाही. हा संपूर्ण प्रकार बँकेसाठी प्रचंड तापदायक झाला आहे.पेरणी तोंडावर, विम्याचा पत्ता नाहीगतवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पेरणीपूर्वी ही रक्कम मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. प्रत्यक्षात विमा कंपनीने ही रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात वळती केली नाही. यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकरी तोंडघशी पडला आहे. आपल्या मंडळाला विमा मंजूर झाला किंवा नाही याची माहितीही बँक स्तरावर कुणाकडूनही मिळत नाही.
पीक विम्याचे कोट्यवधी रूपये गेले कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 10:24 PM
सन २०१८-१९ मध्ये शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविला. मात्र त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेच नाही. यामुळे जिल्हा बँकेने विमा कंपनीला पत्र पाठवून एकूण पात्र शेतकरी आणि त्यांची रक्कम किती आहे याची विचारणा केली आहे. प्रत्यक्षात कंपनीकडून कुठलेही उत्तर जिल्हा बँकेला मिळाले नाही. यामुळे शेतकºयांच्या शेकडो प्रश्नांची उत्तरे देताना बँकेच्या नाकीनऊ आले आहे.
ठळक मुद्देहजारो शेतकरी वैतागले : जिल्हा बँकेचे पीक विमा कंपनीला पत्र