शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जिथे संपला ‘सैराट’, तिथे जन्मला अनाथांचा नाथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:35 PM

सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले.

ठळक मुद्दे४७८ अनाथांचा पिता : सागर रेड्डीच्या धडपडीची झेप

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सैराट सिनेमा संपला. तो संपताना प्रेक्षकांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले... आर्ची आणि परशाच्या खुनानंतर त्यांच्या तान्हुल्याचे पुढे काय झाले असेल? या प्रश्नाचे उत्तर सिनेमात नाही, पण खऱ्याखुऱ्या समाजात सापडले. त्या उत्तराचे नाव आहे, सागर रेड्डी!आंतरजातीय विवाह केलेल्या मायबापांच्या पोटी जन्माला आलेला हा पोरगा. आईबाबाचा खून झाला अन् तो अनाथ झाला. सागर रेड्डीची इथपर्यंतची कहाणी ‘सैराट’सारखीच. पण इथून पुढची कहाणी सिनेमाच्या पडद्यावर मावणारी नाही. हा अनाथ पोरगा आता इंजिनिअर झाला अन् शेकडो अनाथांचा पालक झाला. हा अनाथांचा नाथ सध्या यवतमाळात आलाय. इथल्या अनाथांसाठी ताकद घेऊन..!ही कहाणी सुरू झाली आंध्र प्रदेशात. व्यंकटेश गोविंद रेड्डी आणि पौर्णिमा डेव्हीड काळे या दोघांनी आंतरजातीय लग्न केले. समाजाला हा विवाह खटकला. समाजकंटकांनी या दाम्पत्याचा खून केला. पण त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा जिवंत राहिला. आजोबांनी त्याला लोणावळ्याच्या आंतरभारती बालग्राम या अनाथाश्रमात नेऊन सोडून दिले. तो १८ वर्षांचा झाला अन् अनाथाश्रमाची दारेही त्याच्यासाठी बंद झाली. आता बाहेरच्या जागात आल्यावर त्याच्याकडे स्वत:चे नाव नव्हते, आडनाव नव्हते.त्यामुळे जातही नव्हती अन् जातीचे प्रमाणपत्रही नव्हते. घरच नव्हते, तर रहिवासी दाखला कुठून मिळणार? हे सगळे नव्हते म्हणून मतदार ओळखपत्र नव्हते अन् त्यामुळे तो भारताचा नागरिकही नव्हता!पण तो हरला नाही. उघड्या आकाशाखाली उपाशी निजला. पावसात भिजला. आंध्र प्रदेशातील आपल्या आजोबांचा शोध घेतला. आपले खरे नाव जाणून घेतले. साºया संकटांवर मात करत शिकला. एका कंपनीत इंजिनिअर झाला. पण गलेलठ्ठ पगार घेत सुखासीन आयुष्य जगण्यापेक्षा त्याने मागे वळून पाहिले. अनाथाश्रमातून १८ वर्षे पूर्ण करून बाहेरच्या जागात येणाऱ्या मुला-मुलींचे हाल आपण थांबविले पाहिजे, हा निर्धार केला. २००८ मध्ये सागरने मुंबईत एकता निराधार संघ स्थापन केला. स्वत:चा पूर्ण पगार पणास लावून दोन फ्लॅट भाड्याने घेऊन त्यात अनाथांना ठेवले. जेऊ घातले. शिकवले. नोकरीलाही लावले.वणीत सुरू केले अनाथांसाठी वसतिगृहआज सागरच्या निराधार संघाच्या वसतिगृहात एकूण ४७८ अनाथ मुलं-मुली आहेत. तर आतापर्यंत सागरने ११२८ अनाथांना नोकरीला लावून दिले. तर अनाथाश्रमातून बाहेरच्या जगात येणाºया ६० मुलींचे सुयोग्य स्थळी लग्न लावून दिले. त्यांचे कन्यादान स्वत:च केले. आज एकता निराधार संघाच्या माध्यमातून सागरने मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नाशिक, लातूर यासह कर्नाटकातील बंगळूर, हुबळी, रायचूर आणि तेलंगणातील हैदराबादमध्ये अनाथांसाठी वसतिगृह सुरू केले आहेत. आता तो विदर्भात पोहोचलाय. वणी येथील विजय नगराळे यांच्या माध्यमातून अनाथांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. १२ अनाथ मुला-मुलींना तेथे आश्रय मिळाला असून त्यांच्या शिक्षण, जेवण आणि निवासाची सोय झाली आहे.मदत करा.. मदत मिळवा!अनाथ सागर रेड्डीने वणीत अनाथांसाठी वसतिगृह सुरू केले आहे. पण गरीब कुटुंबातील होतकरू मुला-मुलींना, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील गरजू मुला-मुलींनाही येथे आश्रय दिला जाईल, असे सागरने सांगितले. ज्यांना ज्यांना या वसतिगृहाची मदत हवी आहे, त्यांनी संपर्क साधावा, त्यासोबतच ज्यांना या कार्यासाठी मदत करायची इच्छा आहे, त्यांनीही संपर्क करावा, असे आवाहन सागर रेड्डीने केले आहे. तसेच पुढील महिन्यात बेरोजगार पण गरजू तरुण-तरुणींसाठी वणीमध्ये रोजगार मेळावा घेणार असल्याचेही त्याने सांगितले.