शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

जेथे सातबारा तेथे विहीर द्या

By admin | Published: March 04, 2015 1:43 AM

सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, ते रोखण्यासाठी

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे साकडे : पिंपरी येथे मुक्कामी सभा सिंचनाची सोय नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत, ते रोखण्यासाठी शासनाने सिंचन सुविधा उपलब्ध करून द्याव्या, जेथे सातबारा तेथे विहीर हे सूत्र सरकारने लागू करावे, अशा शब्दात पिंपरी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंना साकडे घातले. मुख्यमंत्री यवतमाळ येथील विभागीय आढावा बैठक आणि रातचांदणा व घोडखिंडी या गावांच्या भेटी आटोपून रात्री १० वाजता यवतमाळ-अकोलाबाजार रोडवरील पिंपरी बु. गावात मुक्कामासाठी पोहोचले. येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्याची संपूर्ण मुभा दिली गेली होती. शेतकरी म्हणाले, खासदार-आमदारांना पेंशन मिळते, मोलकरणीलाही १० हजार रुपये पेंशन दिले जाते, मग शेतकऱ्यांवरच शासनाचा अन्याय का ?, शेतकऱ्यांनाही शासनाने पेंशन लागू करावे. शेततळे आणि बंधारे बांधून शेतकऱ्यांंना कोणताही फायदा होत नाही, त्याऐवजी प्रत्येक शेतात विहीर देऊन सिंचनासाठी २४ तास वीज उपलब्ध करून द्यावी, किमान दिवसातरी पूर्णवेळ वीज कृषिपंपाला मिळावी अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतमालाला खर्चावर आधारित हमी भाव, सोयाबीन, कापूस यावर प्रक्रिया उद्योग, दीर्घ मुदती बिनव्याजी कर्ज आदी मागण्या यावेळी ठेवण्यात आल्या. सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या पिंपरी गावात मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल दहा घरी ही व्यवस्था केली गेली. यातील नेमक्या कोणत्या घरी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम राहील, हे स्पष्ट नव्हते. या सर्वच घरी मुख्यमंत्र्यांसाठी साध्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्री ज्या घरी मुक्काम करेल, अगदी त्याच्या बाजूच्या घरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केली गेली होती. पिंपरी हे गाव नियमित भारनियमनाचा सामना करते मात्र आज वीज पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी वीज वितरण कंपनीने घेतल्याचे दिसून आले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. या गावातील रस्त्यांची स्थिती चांगली आहे. गावाचे पोलीस पाटील पद काही महिन्यांपासून रिक्त आहे. शेजारील हदगावच्या पोलीस पाटलाकडे पिंपरीचा अतिरिक्त प्रभार आहे. प्राथमिक शाळेच्या पटांगणात मुख्यमंत्र्यांसाठी भारतीय बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे बसूनच त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन तत्काळ त्या सोडविण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री मुक्काम करणार असल्याने पिंपरी गावात रात्रीलाही शासकीय अधिकाऱ्यांची उशिरापर्यंत मोठी गर्दी होती. मुख्यमंत्री मुक्कामी येणार असल्याने दोन दिवसांपासून गावात शासकीय यंत्रणेची तयारी सुरू होती. मंगळवारी रात्री तर यात्रा आहे की काय, असे चित्र पहायला मिळाले. एरव्ही साधा कर्मचारी भेटत नाही आज मात्र मंत्रालयातील सचिव दिसले.