शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

खरे कोण? गावकरी की प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 10:03 PM

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.

ठळक मुद्देआजंतीमधील पाणीटंचाई : दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम, टँकरमुक्तीच्या दाव्याविरूद्ध निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराने संपूर्ण देशभर पोहोचलेल्या आजंती गावातील पाणीप्रश्न वेगळ्या वळणावर गेला आहे. गावकरी म्हणतात, पाणीटंचाई आहे तर प्रशासनाचा टँकरमुक्तीचा दावा आहे. या दावे-प्रतिदाव्यांनी संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आता खरे कोण, गावकरी की प्रशासन, हा प्रश्न आहे.पाणीटंचाई आजंती गावाच्या पाचवीला पुजली आहे. दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गुंडभर पाण्यासाठी महिलांची दिवसभर भर उन्हात पायपीट सुरू असते. पाणीप्रश्न घेऊन लोकप्रतिनिधीकडे गेलेल्या शिष्टमंडळातील तीन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. अर्धवट पाईपलाईन, कोरड्या पडलेल्या विहिरी हे या गावचे आजचे चित्र आहे. या गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.दरम्यान, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने आजंती टँकरमुक्त झाल्याचे जाहीर केले. या गावाला दरवर्षी नियमित टँकरची गरज भासत होती. मात्र नवीन योजना झाल्यापासून टँकर बंद झाले. पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे, टंचाईसदृश परिस्थिती नाही, असा अहवाल जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंत्यांनी दिला आहे. गावात असलेल्या सहापैकी दोन चार विहिरींना पाणी असून, तीन विहिरीत नळ योजनेचे पाणी सोडले जाते. नऊ पैकी सहा हातपंप सुरू आहे. ४० खासगी विहिरी आहेत. ग्रामपंचायतीने ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून नळ योजनेचे काम पूर्ण केले आहे, असे उपविभागीय अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय ग्रामस्थांनी नळ योजनेवरून जोडणी घेणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे.आता गावकऱ्यांनी प्रशासनाने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचे सांगत नेर तहसीलदारांना निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाची दिशाभूल केली आहे. मागील ५० वर्षांपासून गाव तहानलेले असताना जिल्हा परिषदेने वस्तूस्थिती लपविली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना सतीश अरसोड, आकाश गायकवाड, प्रीतम राठोड, नरेश राठोड, रवींद्र अवघड, घनश्याम ढगे, राजू काळे, प्रेमसिंह चौहान, अनिल काळे, कैलास ढगे, भूषण गुल्हाने, चंद्रकांत गुल्हाने, सागर गुल्हाने, उमेश ढळे, श्याम राऊत, शिवा कठाडे, अजय राऊत, मुनेश्वर अवघड, दिनेश वानखडे आदी उपस्थित होते.