एक किलो सोने खरेदीचे हे कथित प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून माहूर, फुलसावंगी, महागाव, नांदेड, किनवट आणि मुंबई सभोवताल फिरत आहे. माहूर येथील एका मंदिराच्या पायथ्याखाली एका महाराजांचा मठ आहे. या मठावरून सोने खरेदीचा उगम भक्ताच्या माध्यमातून घडल्याचे सांगितले जाते. फसगत झाल्याचा प्रकार महाराजांच्या लक्षात येताच त्यांनाही धक्का बसला. महाराज आता हयात नाहीत. तेथे ये-जा करणाऱ्या भक्तांमध्ये एकमेकांच्या ओळखीतून सोने खरेदीचा व्यवहार झाल्याचे माहूर येथील विजय जाधव नामक इसमाने उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी संबंधित गैरअर्जदारांना समन्स बजावून त्यांचे बयाण नोंदविले. मात्र, तक्ररदार व गैरअर्जदार यांच्या बयाणातील विसंगती पाहता फिर्यादीचा हेतू तपासण्यात आला. फिर्यादीने आरोपीसोबत झालेल्या व्यवहाराची मोबाईल व्हिडिओ क्लिप तयार करून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती आहे. त्या क्लिपमध्ये व्यवहार झाल्याची कबुली देण्यात आल्याचे सांगितले जाते. कमी दराने सोने मिळत असल्याच्या लालसेपायी सोन्यातील व्यवहार बराच मोठा असल्याचे आणि यात एकापेक्षा अधिक लोक गुंतलेले असल्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान आहे.
फिर्यादीने तक्रार मागे घ्यावी, यासाठीही बरेच प्रयत्न करण्यात आले.
बॉक्स
या प्रकरणात मुंबईच्या एका झिरो पोलिसाने अर्जदारावर दबाव टाकल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई येथील त्या झिरो पोलिसाने या प्रकरणात हस्तक्षेप करून आपल्याला धमकावल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली. परंतु कागदोपत्री बयाणाच्या पलीकडे या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई झाली नाही.
कोट
सोने खरेदी, विक्री प्रकरणात तक्रार प्राप्त झाली. सखोल चौकशी सुरू आहे. गांभीर्य लक्षात घेता सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. लवकरच गुन्हा दाखल केला जाईल.
वालचंद मुंडे,
उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरखेड