शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कशाला जाता परराज्यात, उच्च शिक्षणाची गुणवत्ता महाराष्ट्रात

By अविनाश साबापुरे | Published: May 29, 2023 10:07 AM

देशात सर्वाधिक नॅक मूल्यांकन प्राप्त महाविद्यालये आपल्याच राज्यात

अविनाश साबापुरेयवतमाळ : प्राथमिक शिक्षणात अव्वल परफाॅर्मन्स ग्रेडिंग इन्डेक्स (पीजीआय) मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाचाही दर्जा देशात सर्वांत चांगला आहे. ‘नॅक’ मानांकन मिळविणारी सर्वाधिक महाविद्यालये महाराष्ट्रातच असल्याची बाब नॅकच्याच अहवालातून पुढे आली आहे. आतापर्यंत देशातील ८ हजार ६८६ महाविद्यालयांना हे मानांकन मिळाले असून, त्यात राज्यातील सर्वाधिक १,८३४ महाविद्यालये, ३५ विद्यापीठांचा समावेश आहे. राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेमार्फत (नॅक) दर पाच वर्षांनी महाविद्यालयांतील सोयी-सुविधा आणि शैक्षणिक दर्जा निश्चित करण्यासाठी मूल्यांकन केले जाते. त्यानंतर महाविद्यालयांना व विद्यापीठांना श्रेणी दिली जाते. विद्यापीठ अनुदान आयोगाने १९९४ मध्ये निर्माण केलेली नॅक ही स्वायत्त संस्था बंगळुरू मुख्यालयातून कारभार पाहते. ८ ऑक्टोबर २०१०च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनानेही महाविद्यालयांनी मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करून घेणे अनिवार्य केले.

पाच वर्षांतून एकदा मूल्यांकन होत असले तरी ॲन्युअल क्वालिटी अशुअरन्स रिपोर्ट (एक्यूएआर) नॅक कार्यालयाकडे दरवर्षाला पाठवावा लागतो. याकडे बहुतांश महाविद्यालयांकडून दुर्लक्ष होते. त्याची दखल घेत महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण संचालनालयाने २३ मे रोजी महाविद्यालयांना तंबी दिली आहे. अहवाल न दिल्यास २०२३-२४ या सत्रातील प्रवेशावर बंदी घालण्यासह विद्यापीठाची संलग्नताही रद्द करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या कठोर भूमिकेमुळेच देशात सर्वाधिक मानांकन प्राप्त महाविद्यालयांची संख्या नॅकच्या अहवालात आली आहे, हे विशेष. 

विद्यापीठांचीही बाजी : आतापर्यंत देशातील ४०६ विद्यापीठांनी हे मूल्यांकन मिळविले आहे. त्यातील ४३ विद्यापीठे तामिळनाडूतील, ३७ उत्तराखंडचे, ३५ विद्यापीठे महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर कर्नाटक ३३, राजस्थान ३१, गुजरात २३, दिल्ली १८, मध्य प्रदेश १७, पश्चिम बंगाल १६, हरयाणा १६, आंध्र प्रदेश १५, तेलंगणा १५, ओडिशा १४, उत्तराखंड ११, पंजाब १०, हिमाचल ९, तसेच केरळ, छत्तीसगड, बिहार, आसाममधील प्रत्येकी आठ विद्यापीठांनी मानांकन मिळविले. जम्मू - कश्मीर व झारखंडमध्ये प्रत्येकी ७, अरुणाचल प्रदेश ३, मेघालय, चंडीगड, पद्दुचेरी, सिक्कीम, त्रिपुरा प्रत्येकी २, तर गाेवा, मणिपूर, मिझोराम, नागालॅंडमध्ये प्रत्येकी एका विद्यापीठाला मानांकन आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थी