निश्चल गौर।लोकमत न्यूज नेटवर्कडोंगरखर्डा : पती-पत्नीचे नाते सात जन्मांचे. पत्नी पतीला अखेरपर्यंत साथ देते. सात जन्म तोच पती मिळावा म्हणून साकडे घालते. संसारात एकमेकांची सतत साथ देणाºया एका दाम्पत्याने अखेरचा श्वासही मिळूनच घेतल्याची प्रचिती येथे आली.महादेव नारायण मुंगले (७०) आणि सिंधुबाई महादेव मुंगले (६५), असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. महादेव मुंगले यांना मेंदूज्वर झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यामुळे त्यांना सोमवारी यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. पत्नी सिंधुबाई त्यांच्या सोबतच होती. मात्र सोमवारी दुपारी उपचारादरम्यान महादेव यांचा मृत्यू झाला. या घटनेने सिंधुबाईचे अवसान गळाले. त्यांना धक्का बसला.सिंधुबाई यांनाही अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र पती वियोगाच्या धक्क्यातून त्या सावरल्याच नाही. अखेर महादेव यांना सात जन्मांची साथ देण्याची ग्वाही देणाºया सिंधुबार्इंनीही मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. या दाम्पत्याच्या मागे दोन मुले, नातवंड व परिवार आहे.
पतीच्या वियोगात पत्नीनेही त्यागला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:50 AM
पती-पत्नीचे नाते सात जन्मांचे. पत्नी पतीला अखेरपर्यंत साथ देते. सात जन्म तोच पती मिळावा म्हणून साकडे घालते. संसारात एकमेकांची सतत साथ देणाºया एका दाम्पत्याने अखेरचा श्वासही मिळूनच घेतल्याची प्रचिती येथे आली.
ठळक मुद्देडोंगरखर्डाचे दाम्पत्य : रूग्णालयात अखेरचा श्वास