शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पत्नीने घेतला गळफास तर पतीने केले विषप्राशन; यवतमाळ जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:19 PM

पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनाचे चालक शंकर राठोड यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास पोलीस क्वॉर्टरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देकारण अद्यापी गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :    पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाहनावरील चालकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  त्याच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना येथील पोलीस वसाहतीत क्वॉर्टरमध्ये शुक्रवारी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास घडली.वर्षा शंकर राठोड (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. शंकर सुंदरसिंग राठोड (४८) असे विष प्राशन करणाऱ्या पोलीस वाहन चालकाचे नाव आहे. त्याला पुढील उपचारार्थ नांदेड येथे हलविण्यात आले आहे. पुसदच्या एसडीपीओंचे वाहन चालक सुंदरसिंग राठोड पत्नी वर्षा (३०) आणि वंश (६) व विराट (४) या दोन चिमुकल्यांसह शहर पोलीस ठाण्यामधील पोलीस वसाहतीतील बिल्डींग क्रमांक ११ मधील क्वॉर्टर नंबर ९ मध्ये राहात होते. शुक्रवारी शंकर सकाळी बाहेर गेले होते. त्यानंतर पत्नी वर्षाने मुलांची तयारी करून त्यांना शाळेत सोडले. परत ८ वाजता घरी आल्यानंतर त्यांनी घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यानंतर शंकर घरी परत आले असता पत्नीने आत्महत्या केल्याचे पाहून त्यांनीही स्वत: विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.ही घटना लक्षात येताच शेजाऱ्यांनी त्यांना सर्वप्रथम येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. नंतर त्यांना नांदेड येथे उपचारार्थ हलविण्यात आले. हा सर्व थरार केवळ घरगुती कारणातून झाल्याचे समजते. पुसदचे एसडीपीओ अनुराग जैन, शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम, वसंतनगरचे ठाणेदार प्रदीपसिंह परदेशी, वाहतूक शाखेचे रविंद्रनाथ भंडारे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी मनोहर सुंदरसिंग राठोड यांच्या तक्रारीवरून तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. दरम्यान, या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या