लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तळपत्या उन्हाने संपूर्ण जंगल होरपळून निघाले आहे. यामुळे भूकेने व्याकूळ झालेले प्राणी अन्नाच्या शोधात भटकतात. शेवटी पाणवठ्यांजवळ ठाण मांडून बसतात. अशा व्याकूळ प्राण्याना अन्न पुरविणारे काही देवदूतही शहरापासून दूर जंगलात येतात. कधी ब्रेड, कधी बिस्किटे, तर कधी फळभाज्या टाकून हे देवदूत प्राण्यांची भूक भागविण्याचे काम करीत आहे.यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील उमर्डा नर्सरीमध्ये एमआयडीसीच्या पाईपलाईनवर अनेक पाणवठे आहेत. येथे आलेले वन्यप्राणी भूकेने व्याकूळ असतात. मात्र पाण्याशिवाय त्यांना काही मिळत नाही. वृक्ष निष्पर्ण झाले आहे. यामुळे कुठलेही अन्न वन्यप्राण्याना मिळत नाही. यात माकडांची सर्वाधिक तारांबळ उडते. या जंगलात शंभरावर माकडांचा कळप आहे. काही वन्यप्रेमी नागरिकांनी त्यांच्यासाठी खास अन्न टाकण्याचे काम सुरू केले आहे.ही मंडळी दररोज ब्रेड, बिस्किटे, फळ, भाज्या आणि इतर पदार्थ शहरातून आणतात आणि जंगलातील प्राण्यांसाठी टाकतात. हे अन्न दिसताच व्याकूळ वन्यप्राण्याची यावेळी प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळते.त्यांनी नावे ठेवली गुप्तकधी दुचाकी, तर कधी चारचाकी वाहनाने अन्न देण्यासाठी येणारी ही मानवतावादी मंडळी वन्यप्राण्यांसाठी देवदूतच ठरली आहे. त्यांना अनेकांनी कुठले आहेत, काय काम करता, असे विचारले. मात्र ते आपले नाव सांगत नाही. केवळ पशुपक्षांची सेवा करण्याचा उद्देश असल्याचे ते म्हणतात.
वन्यप्राण्यांसाठी ‘त्यांनी’ जपली मानवता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 10:01 PM
तळपत्या उन्हाने संपूर्ण जंगल होरपळून निघाले आहे. यामुळे भूकेने व्याकूळ झालेले प्राणी अन्नाच्या शोधात भटकतात. शेवटी पाणवठ्यांजवळ ठाण मांडून बसतात. अशा व्याकूळ प्राण्याना अन्न पुरविणारे काही देवदूतही शहरापासून दूर जंगलात येतात.
ठळक मुद्देअनामिक दिलासा : जंगलात अन्न, फळ आणि भाज्यांचा पुरवठा