राळेगाव (यवतमाळ) : नरभक्षक वाघिणीला ठार मारल्याने राज्यभरातील वन्यजीवप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र वाघिणीच्या हल्ल्यात ज्यांना सगेसोयरे गमवावे लागले, त्या गावक-यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी पांढरकवडा, राळेगाव, कळंब तालुक्यातील कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल असे गावकºयांनी सांगितलेवाघिणीच्या मृत्यूनंतरही या भागात अजून एक वाघ व दोन बछडे असल्याने भीती संपलेली नाही, असे वरधचे पोलीस पाटील प्रवीण कळसकर यांनी सांगितले. सायंकाळनंतर संचारबंदीसदृश्य स्थिती असते, असे वरधच्या सरपंच सरपंच कांचन मेश्राम यांनी सांगितले.‘अवनी’च्या मृत्यूवरून राजकीय फैरीमुंबई : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वन विभागाकडून ठार मारण्यात आलेल्या अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी वाघिणीच्या मृत्यूवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची बाजू प्रसार माध्यमांपुढे मांडली. तर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सरकारवरला गोळ्या घालायच्या का, असा सवाल केला आहे.दिवाळीनिमित्त सोमवारी पत्रकारांसाठी आयोजित स्रेहमीलन कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, अवनीला ठार मारण्याची कार्यपद्धतीबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत, त्याची पडताळणी केली जाईल. वाघांची संख्या वाढविण्याचा सरकारचा प्रयत्न असताना एखाद्या वाघिणीला ठार मारावे लागणे हे दुर्देवीच आहे. पण ती वाघीण नरभक्षक होती. तिने आतापर्यंत अनेक जणांचा बळी घेतले हेही वास्तव आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी या प्राणिमित्र आहेत. या आधीही प्राण्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात त्यांनी माझ्याकडे चिंता व्यक्त केलेली होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.मग सरकारवरही गोळ्या झाडायच्या का? : शिवसेनामुंबई : गेल्या चार वर्षांत शेकडो शेतकºयांनी केलेल्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. मग या सरकारवरही गोळ्या झाडायच्या का, असा सवाल शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी केला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, यवतमाळमध्ये अवनी या वाघिणीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यासाठी हैदराबादहून शूटर मागविण्यात आले होते. राज्यात एवढे एन्काऊंटर झाले. त्यात बरेच खोटेही होते.वाघिणीला अन्य मार्गाने वाचविता आले असते. मात्र, वनमंत्र्यांनी ते मनावर घेतले नाही. भाजपच्याच केंद्रीय मंत्री मनेका गांधींनी यावर आवाज उठवला याबाबत त्यांचे आम्ही आभार मानतो. तसेच उद्धव ठाकरे हे वाईल्डलाईफ फोटोग्राफर आहेत. त्यांची मुलेही आहेत. तसेच शिवसेनेचे चिन्ह वाघ असल्याने हा विषय आमच्यासाठी जिव्हाळ्याचा असल्याचेही राऊत म्हणाले.
वन्यप्रेमींनो, वाघग्रस्त भागात मुक्कामाला या! गावकऱ्यांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 5:50 AM