लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड येथील पैनगंगा अभयारण्य वनपरीक्षेत्रातील भवानी गावानजीक चिखली शिवारातील शेतातील विहीरीत पडलेल्या अस्वलाला वन्यजीव विभागाकडून जीवनदान मिळाले . चिखली शिवारातील बाबुराव बेले यांच्या शेतातील एका जमीन लेवल असलेल्या विहिरीत अस्वल पडल्याची माहिती शेतमालकाने वन्यजीव विभागाला दिली. माहिती मिळताच तत्काळ कोरटा वन परिक्षेत्राचे वनपाल सुदर्शन पांडे आपल्या टीम सह घटनास्थळी हजर झाले. सदर अस्वल सकाळी खाद्य शोधासाठी फिरत असताना विहिरीत पडले . वनकर्मचाऱ्यांनी लगतची सर्व शेती खाली करून घेतली, लगेच विहिरीत एक खाट दोरी बांधून विहिरीत सोडली. नंतर विहिरीत लाकडी शिडी सोडली. त्या शिडीच्या साहाय्याने अस्वल लगेच विहिरी बाहेर आले आणि जंगलात पळाले. सदर अस्वलास कोरटा वनपरिक्षेत्र तर्फे बाहेर काढण्यात आले.