लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यजीव अभयारण्याबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नैसर्गिक स्रोतांमध्ये गोसावी नाला, कुरची कुडी नाला व नैसर्गिक तलाव, हे तीन मुख्य स्रोत आहेत. यांपैकी गोसावी नाल्यात ठिकठिकाणी बंधारे बांधल्याने वन्यजीवांसाठी पाण्याची सोय होत आहे.मात्र कुरची नाला व नैसर्गिक तलावातील जलपातळी प्रचंड खालावली आहे. या तलावावर दररोज वन्यजीव आपली तहान भागविण्यासाठी येतात. या तलावात सोलार पंपच्या साह्याने पाणी सोडल्यास ते पाणी पावसाळ्यापर्यंत टिकून वन्यजीवांना दिलासा मिळणार आहे. अभयारण्य प्रशासनाने यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी वन्यजीवप्रेमींकडून होत आहे. नैसर्गिक तलाव हा वन्यजीवांचा मुख्य जलस्रोत आहे. या तलावाच्या जवळच एक जुनी विहीर असल्याचे आणि विहिरीत भरपूर पाणी असल्याचे टिपेश्वर गावच्या लोकांचे म्हणणे आहे. आता या गावाचे पुनर्वसन झाले आहे. या विहिरीवर एक मोटार बसवून ती सौरऊर्जेच्या साह्याने चालू केल्यास हजारो लीटर पाणी या तलावात सोडता येणे शक्य आहे.तर वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याबाहेर पडतीलआता उन्हाचा पारा ४३ अंशापार गेला आहे. त्यामुळे झपाट्याने तलावातील पाणी आटत आहे. आतातरी तातडीने त्याकडे लक्ष पुरविण्याची गरज आहे. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सध्या राज्यभरात पाण्याअभावी वन्यजीव मानवी वस्त्यांकडे जात आहेत. काही ठिकाणी वाघाने मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव परिसरात अशीच एक वाघीण तिच्या पिल्लासह आहे. तिने केलेल्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत आहेत. टिपेश्वर परिसरातील बोथ बहात्तर गाव परिसरात मागील आठवड्या वाघाने दर्शन दिले.तलावातील जलपातळी न टिकविल्यास टिपेश्वरमधील वन्यजीव सैरावैरा होऊन अभयारण्याच्या बाहेर पडण्याची शक्यता आहे.
टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:35 PM
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर केळापूर व घाटंजी तालुक्यात असलेले टिपेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन नैसर्गिक जलस्रोत आहेत. तसेच वन्यजीव विभागाने जागोजागी सौरउर्जेवर चालणारे पाणवठे तयार केले आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे नैैसर्गिक स्रोेतांची जलपातळी वेगाने खालावत चालली आहे.
ठळक मुद्देजलपातळीत घट : केवळ तीन नैसर्गिक स्रोत