लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : टंचाईच्या काळात गोखीचे पाणी यवतमाळकरांचीच नव्हेतर वन्याजीवांचीही तहान भागवित आहे. या पाईपलाईच्या लिकेजवर सामाजिक संस्थांच्या पुढाकरातून वन विभागाने पाठवठे साकारले आहे. आता येथे माकड आणि हरणांचे कळप आपली तहान भागवित असल्याचे दिसत आहे.जिल्ह्याचा भूभाग मोठ्या प्रमाणात जंगलाने व्यापला आहे. मात्र जंगलातील जलस्त्रोत आटले आहे. यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावापर्यंत पोहचले आहेत. वन्यप्राण्याना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनविभागाने विविध सामाजिक संस्था आणि रोटरी क्लबच्या सहाय्याने जंगलामध्ये पाणवठे तयार करण्यास प्रारंभ केला आहे. दारव्हा ते यवतमाळ मार्गावरील गोखी प्रकल्पाच्या पाईपलाईनवर पाणवठे तयार करण्यात आले आहे. यासाठी वनपाल संजय माघाडे यांनी पुढाकार घेऊन सामाजिक संस्थाना आवाहन केले होते. त्यांच्याच प्रयत्नातून सामाजिक संस्था पुढे आल्या आहे.उद्यागासाठी पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला ‘जॉर्इंट’मध्ये ‘लिकेज’ आहे. त्या पाण्याचा स्त्रोत पाणवठ्यांच्या बशीला जोडला आहे. यामुळे या बशा आपोआप भरतात. या ठिकाणावर माकड, निलगाई, मोर, लांडोर, हरिण यांचे कळप दररोज दृष्टीस पडतात. पाण्याच्या या व्यवस्थेने वनप्राण्यांना दिलासा मिळत आहे.डीएफओकडे प्रस्ताववन्यप्राण्यांना पेयजलाची व्यवस्था करण्यात यावी म्हणून विविध रेंजकडून डीएफओकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळायची आहे. यासंदर्भात युद्धपातळीवर निर्णय झाल्यास पाण्यावाचून तडफडणाºया वन्यजीवांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पानवठ्यावर आता पशु पक्षांची गर्दी जमत असून त्यांची तहान भागत आहे.
गोखीच्या पाईपलाईनवर वन्यजीवांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 10:08 PM
टंचाईच्या काळात गोखीचे पाणी यवतमाळकरांचीच नव्हेतर वन्याजीवांचीही तहान भागवित आहे. या पाईपलाईच्या लिकेजवर सामाजिक संस्थांच्या पुढाकरातून वन विभागाने पाठवठे साकारले आहे. आता येथे माकड आणि हरणांचे कळप आपली तहान भागवित असल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्देसामाजिक संस्थांचा पुढाकार : लिकेज पाण्याचा सदूपयोग, वन विभागाचे सहकार्य