शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

बंजारा समाजाचे प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 9:33 PM

बंजारा समाजाची काशी पोहरादेवी (जि. वाशिम) येथे नंगारा वस्तुसंग्रहालय भूमिपूजनानिमित्त झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमातूनच गोर बंजारा समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढण्याचे महत्वाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांची ग्वाही : शिष्टमंडळाने घेतली भेट, बैठकीत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बंजारा समाजाची काशी पोहरादेवी (जि. वाशिम) येथे नंगारा वस्तुसंग्रहालय भूमिपूजनानिमित्त झालेल्या अभूतपूर्व कार्यक्रमातूनच गोर बंजारा समाजाचे सर्व प्रश्न निकाली काढण्याचे महत्वाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी बैठकीत ना. संजय राठोड यांनी शिष्टमंडळाच्यावतीने बंजारा समाजाची भूमिका मांडली. गोर बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश, नॉन क्रिमिलियर अटीतून वगळून पदोन्नतीमध्ये आरक्षण, बंजारा समाज राहत असलेले तांडे व कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावावर करणे, बंजारा लोककलांचा सांस्कृतिक धोरणात समावेश, बंजारा क्लस्टर विकास, पोहरागड येथे कौशल्य विकास कार्यक्रमाधारित औद्योगिक विकास संस्थेची निर्मिती आदी मागण्यांचे सादरीकरण शिष्टमंडळाने केले.यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. शिष्टमंडळात आमदार हरिभाऊ राठोड, डॉ. तुषार राठोड, अ‍ॅड. नीलय नाईक, आंध्रप्रदेशचे माजी मंत्री अमरसिंग तिलावत, जगन्नाथराव (हैदराबाद), आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे राजू नाईक, गोविंद राठोड, एस.टी. नाईक, मिलिंद पवार, मंगल चव्हाण, मोहन चव्हाण, डॉ. टी.सी. राठोड, योगेश चव्हाण, सचिन जाधव, डॉ. महेश चव्हाण, सुभाष जाधव, ज्योतीराम चव्हाण, बळीराम चव्हाण, राजाराम जाधव, किरण वडते, रवींद्र पवार, नीलेश राठोड, बापूराव राठोड आदींचा समावेश होता. गेल्याच आठवड्यात शिष्टमंडळाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती.