शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांन विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
4
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
5
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
6
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
8
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
9
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
10
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
11
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
12
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
13
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
14
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
15
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
16
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
17
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश
18
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
19
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
20
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी

दिवाळीला तरी साखर मिळणार का? तूर्त कुठल्याच जिल्ह्याला साखरेचा कोटा उपलब्ध झाला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 6:02 PM

Yavatmal : उत्सवाच्या काळात साखरेचा पुरवठा केव्हा होणार

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा आणि नियमित धान्याचे वितरण केले जाते. यामध्ये सण, उत्सवाच्या काळात साखरेचा समावेश असतो. गतवर्षी दिवाळीच्या पर्वावर आनंदाचा शिधा वितरित झाला. यावर्षी मात्र तूर्त राज्यातील कुठल्याच जिल्ह्याला साखरेचा कोटा उपलब्ध झाला नाही. यामुळे नोव्हेंबर महिन्यात स्वस्त धान्य दुकानात साखर असणार किंवा नाही हे सांगणे तूर्त अवघड आहे. दिवाळीला दुकानातून साखर न मिळाल्यास उत्सव गोड कसा होणार, असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकांपुढे उभा आहे.

राज्यात कुठेच साखरेचे आवंटन उपलब्ध नाही स्वस्त धान्य दुकानात साखर वितरित करण्यापूर्वी राज्याला कुठून किती साखरेचा कोटा मिळणार याची माहिती प्रथम पुरविली जाते. त्यानुसार वितरणाचे नियोजन केले जाते. यावेळी राज्यातील सर्वच जिल्ह्यात साखरेचा कोटा आलेला नाही. यामुळे तूर्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सहा तालुक्यांना मिळणार मोफत ज्वारी ज्या तालुक्यात हमी केंद्रावर ज्वारीची खरेदी करण्यात आली. त्या ठिकाणी उपलब्ध ज्वारीच्या स्थितीनुसार अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कुटुंबाला मोफत ज्वारी दिली जाणार आहे. गव्हाच्या जागेवर ही ज्वारी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

गहू, तांदूळ आणि ज्वारी पुसद, झरीजामणी, महागाव, केळापूर, राळेगाव आणि कळंब तालुक्यात गव्हाच्या जागेवर ग्राहकांना ज्वारी दिली जात आहे. यासोबतच तांदूळ दिले जात आहेत.

कोटा उपलब्ध होताच साखरेचा पुरवठा होणार "तूर्त साखरेचा कोटा उपलब्ध झालेला नाही. हा कोटा उपलब्ध होताच साखरेचा पुरवठा होणार आहे. सहा तालुक्याला मोफत ज्वारी दिली जात आहे." - सुधाकर पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ