महागाव : देशातील सर्वात मोठा जात समूह असलेल्या ओबीसींची जनगणना करण्यास सरकार तयार नाही. देशात पशु, पक्ष्यांची जनगणना होते. परंतु ओबीसींची होत नाही. जोपर्यंत जातिनिहाय जनगणना होणार नाही, तोपर्यंत ओबीसीची सत्ताधारी जमात बनू शकणार नाही, असे प्रतिपादन विलास काळे यांनी केले.
स्थानिक सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटना केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष प्रमोद राऊत, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर रायमल, जिल्हा सहसचिव अशोक मोहुरले, विभागीय अध्यक्ष साहेबराव धात्रक यावेळी उपस्थित होते. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी सारथी ही संस्था स्थापन करण्यात आली. त्याचा फायदा जास्तीत जास्त ओबीसी विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्यानबा गुट्टे, एम.एस. तिडके, रुपेश कऱ्हे, अंकुश आडे, बालाजी महाले, अंकुश राठोड, अविनाश हनवते, सुरेश कदम, भाऊ माटाळकर, दीपक चिंतले, गजानन करे, योगेश कऱ्हे आदी उपस्थित होते.