शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, 80 नाही 90 नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
2
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
3
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
4
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
5
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
6
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
7
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
8
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
9
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
10
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
11
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
12
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
13
"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 
14
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
15
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
16
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
17
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना
18
सुपरवायझरची हत्या करून सुरक्षा रक्षक पसार? चाकूने मानेवर आणि हातावर केले वार
19
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?
20
कोट्यवधींच्या मालक आहेत राधिका गुप्ता, तरीही लक्झरी कार नकोय; कारण ऐकून अवाक् व्हाल 

घराला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 9:41 PM

Yawatmal News मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत पहिल्या माळ्यावर झोपेत असलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर बहीण भाऊ जखमी झाल्याची घटना येथे घडली.

ठळक मुद्देबहीण-भाऊ जखमी

यवतमाळ : शहरातील गणेश चौकातील घराला गुरुवारी रात्री १.१५ वाजता आग लागली. या आगीने काही मिनिटात रौद्ररुप धारण केले. अंत्यविधीचे साहित्य विक्रीचा व्यवसाय असल्याने गवत, लाकूड, बांबू याने पेट घेतला. या आगीत पहिल्या माळ्यावर झोपून असलेल्या महिलेचा होरपळून मृत्यू झाला. मदतीसाठी सर्वच जण प्रयत्न करीत असताना आगीमुळे कुणालाही पुढे जाता येत नव्हते. काही मिनिटांत होत्याचे नव्हते झाले. आगीत बहीण-भाऊही जखमी झाले आहे.

रेखा विनोद पुट्टेवार (५६) असे मृत महिलेचे नाव आहे, तर प्रगती व यश प्रमोद पुट्टेवार असे जखमी झालेल्या बहीण-भावांची नावे आहेत. पुट्टेवार कुटुंबातील दोन्ही भावांचे निधन झाल्याने रेखा व ज्याेती या दोन जावा व्यवसाय करून कुटुंब चालवत होत्या. अंत्यविधी साहित्य विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. त्यासाठी घरासमोरच बांबू, गवत, गवऱ्या व इतर साहित्य ठेवलेले होते. रात्री अचानक या साहित्याने पेट घेतला. जवळ भूमिगत वीजजोडणीची पेटी आहे. यातून शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आगीने पूर्ण घर जळून राख झाले. पहिल्या मजल्यावर रेखा पुट्टेवार खोलीत झोपल्या होत्या. जमिनीवरच्या साहित्याने पेट घेतल्यानंतर आगीच्या ज्वाळा पहिल्या मजल्यावरील खोलीपर्यंत पोहोचल्या. दरवाजे, खिडक्यांनी पेट घेतला. चारही बाजूंनी आगीचे लोट उठले होते. यामुळे उष्णतेने व धुराने गुदमरून रेखा पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी धडपणाऱ्या यश आणि प्रगती या दोघांचेही हात भाजले. प्रत्येक जण आग विझविण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. परिसरात घरे दाटीवाटीने आहेत. त्यामुळे इतरत्र आग पसरण्याचा धोका वाढला. १ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दलाला फोन करण्यात आला. पाच मिनिटांत अग्निशमन बंब हजर झाला. सलग पाच बंब रिकामे केल्यानंतर आग नियंत्रणात आली. मात्र तोपर्यंत जवळपास २० लाखांचे नुकसान या आगीत झाले आहे.

मुलीच्या लग्नाची होती तयारी

ज्योती पुट्टेवार यांची मोठी मुलगी प्रगती हिचे लग्न जुळले आहे. त्याची तयारी पुट्टेवार कुटुंब करीत होते. लग्नासाठीचा कपडा, किराणा घरी आणला होता. तोही या आगीत जळून खाक झाला आहे. तीन वर्षांपूर्वी लोखंडी पूल परिसरात आगीने घर पेटले. यात चिमुकलीचा होरपळून मृत्यू झाला. ही आग दिवसा लागली होती. त्याची आठवण गुरुवारच्या घटनेने ताजी केली.

टॅग्स :fireआग