पांडुरंग भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कसोनखास : उत्तरवाढोणा शिवारातील धनगरी तलावाच्या डागडुजीकरिता दारव्हा सिंचन विभागाने सुरू केलेले काम वनविभागाने थांबविले. पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात मोठा अनर्थ होण्याची भीती आहे. पाण्याच्या साठ्याने तलाव फुटून आजूबाजूचे शेत आणि उत्तरवाढोणा गावाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंचन विभाग व वनविभागामध्ये या कामाविषयी समन्वय नाही. सध्यातरी कुठल्याही उपाययोजना होताना दिसत नाही.सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले. त्याला यावर्षी दारव्हा सिंचन विभागाने प्रतिसाद देत तलावाच्या दुरुस्तीकरिता २२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.दीर्घ प्रतीक्षेनंतर काम सुरू झाले. भिंतीची भगदाडं बुजविणे सुरू असतानाच सोनखास उपवनक्षेत्राने सदर काम थांबविले. तलाव वनविभागाच्या हद्दीत येतो, कुठलाही पत्रव्यवहार सिंचन विभागाने केला नाही, असे कारण देत वनविभागाने काम थांबविले.वनविभागाने काम थांबविल्यामुळे धरणाची कोरण्यात आलेली भिंत जेसीबीने थातुरमातूर बुजविण्यात आली. आता गेली अनेक दिवसांपासून हे काम बंद आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाच्या पाण्याने तलाव भरून फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावाचे पाणी उत्तरवाढोणा गावात शिरून मोठा धोका होण्याची भीती आहे. सदर काम तत्काळ हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभावतलावाच्या दुरुस्तीकरिता सिंचन व वनविभागात समन्वयाचा अभाव आहे. पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास होणाºया नुकसानीला सदर दोनही विभाग जबाबदार राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.कामाच्या ठिकाणापर्यंत बांधकाम साहित्य नेण्याची रहदारी पास सिंचन विभागाने काढली नाही. याची पूर्तता केल्यानंतर काम सुरू करण्यास हरकत नाही.- नितीन बिजवार,वनरक्षक, सोनखास
उत्तरवाढोणाच्या धनगरी तलावाचे काम थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 5:00 AM
सोनखास उपवनक्षेत्रात उत्तरवाढोणा शिवारात गेली ५० वर्षांआधी सिंचन विभागाच्यावतीने धनगरी तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. अनेक वर्षांपासून तलावाची भिंत जागोजागी लिकेज आहे. पावसाळा संपताच संपूर्ण तलाव रिकामा होवून जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे या तलावाच्या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन दिले.
ठळक मुद्देवनविभागाची आडकाठी : अपूर्ण कामामुळे अनर्थ होण्याची नागरिकांना भीती