लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जालना येथे महिला राजपत्रित अधिकाऱ्यांशी २ जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा नियोजन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलन केले.जालना जिल्हा परिषदेत अर्थ आणि सांख्यीकी विभागातील महिला राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. याप्रकरणी संबंधितावर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. नंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड, जिल्हा सांख्यीकी अधिकारी पी.पी.पेंदाम, एम.एम.दुशिंग, एस.डी.देवस्थळे, एच.एस.दहिकर, आर.डी. देसाई, वि.मा.वाहूळे, सं.पि.पवार, नि.स.वसतकर, अ.दे.बारेकर, वा.मा.राठोड, सं.ना.सुळके, सं.भा.पारधी, सं.बा. होले, उ.द.अहिर, सं.के.बेले आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 11:45 PM
जालना येथे महिला राजपत्रित अधिकाऱ्यांशी २ जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. त्याच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा नियोजन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आंदोलन केले.
ठळक मुद्देजालना येथे महिला राजपत्रित अधिकाऱ्यांशी २ जानेवारीला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले