लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कार्यानुभव शिक्षकांची शासनाच्या नवीन आदेशाने कोंडी झाली आहे. त्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर धडक देऊन निवेदन सादर केले.महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक संघाच्या नेतृत्वात हे शिक्षक शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडकले. त्यांनी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १ सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयाला विरोध दर्र्शविला. हा निर्णय रद्दची मागणी केली. या निर्णयानुसार अंशकालीन निदेशक म्हणून कार्यरत शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे अंशकालीन निदेशकांवर अन्याय होत असून त्याविरूद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. हे निवेदन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनाही देण्यात आले. जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकाºयांना निवेदन देताना संघाचे जितेंद्र जुनघरे, अतिक खान, विश्वास वानखडे, अनिल कलोडे, रवींद्र शंडे, जगदीश बोढाले, गुलाम उमरतकर, जगदीश शिंदे, रवींद्र कटकमवार, सचिन मार्कंड आदी उपस्थित होते.
कार्यानुभव शिक्षकांची होतेय कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 9:46 PM
जिल्ह्यातील कार्यानुभव शिक्षकांची शासनाच्या नवीन आदेशाने कोंडी झाली आहे. त्याच्या निषेधार्थ शिक्षकांनी जिल्हा परिषदेवर धडक देऊन निवेदन सादर केले.
ठळक मुद्देजिल्ह्यातील कार्यानुभव शिक्षकांची शासनाच्या नवीन आदेशाने कोंडी झाली आहे.