ग्रामीण रस्ते डांबरीकरणाविना
मारेगाव : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. आज तालुक्यातील अनेक गावात कच्चे रस्ते बांधलेले आहे. परंतु या रस्त्यावर डांबरीकरण न केल्यामुळे पावसाळ्यात या मार्गाची दुरवस्था झाली असून पायदळ चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील नागरिक डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवा
मारेगाव : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध होत नसल्याने उपचारासाठी दाखल रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे रुग्णालयात भौतिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
महिला बचतगट आर्थिक संकटात
मारेगाव : आर्थिक दुर्बल घटकातील हजारो महिलांनी आर्थिक उन्नती साधण्यासाठी महिला बचत गटाची स्थापना केली. परंतु या महिला बचत गटांना बँकांकडून योग्य पाठबळ मिळत नसल्याने या बचत गटांना स्वयंंरोजगार उभारण्यास अडचणीचा सामना करावा लागत आहे.
अंतर्गत रस्त्यावरून होतेय जड वाहतूक
मारेगाव : शहरातील अंतर्गत रस्ते जड वाहतुकीला योग्य नसून या रस्त्यावरून खुलेआमपणे जड वाहतूक होत आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जड वाहने जात असल्याने काही महिन्यांपूर्वी बांधलेल्या रस्त्याची वाट लागली आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कॅप्शन : पुरड ते टुंड्रा मार्गावर तयार झाले मृत्युकुंड
वणी तालुक्यातील पुरड ते टुंड्रा या दोन किमी रस्त्याची अतिशय दैनावस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी असे मृत्युकुंड तयार झाले असून वाहनचालकांची यातून मार्ग काढताना चांगलीच दमछाक होते. (छाया : संजय कालर, वणी.)