कामाचा शोध : साखर कारखाने, वीटभट्ट्या आणि कापूस वेचणीरूपेश उत्तरवार यवतमाळअपुऱ्या पावसाने मराठवाडयातिल शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात पीक नसल्याने मजुरांच्या हातात काम राहीले नाही. यामुळे मजुरीच्या शोधात निघालेल्या मजुरांनी आपले गाव सोडले आहे. या कामाच्या शोधात मजुरांनी विदर्भात पाऊल ठेवले आहे. मजुरांचे लोंढे विदर्भाच्या दिशेने आगेकूच करीत आहे. साखर कारखाने, वीटभट्या आणि कापसाकरिता हे मजूर गावागावात काम शोधत आहे.रोजगार हमी योजनेतून कामाची हमी मजुरांना देण्यात आली आहे. तरी सध्या गावात काम उपलब्ध नाही. यामुळे मजूर कामाच्या शोधात विदर्भाकडे निघाले आहेत. प्रामुख्याने रस्त्यांच्या कामासाठी हे मजूर विदर्भात येत आहे. यासोबतच ऊसतोडीसाठी मजूर मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याच्या क्षेत्रात वळले आहे. हिंगोली जिल्ह्यातील भटसावंगी तांडा गावातील शेतमजुरांनी गाव सोडले. हे मजूर वर्धा जिल्ह्यातील साखर कारखाण्यासाठी दाखल झाले आहे. त्यासोबत यवतमाळ जिल्ह्यातील वीटभट्टीवर काम करण्यासाठी काही मजूर जिल्ह्यात आले आहे. याचप्रमाणे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील कामगार कामाच्या शोधात उपराजधानीपर्यंत पोहचले आहेत. संपूर्ण परिवारच कामावरमजुरीच्या शोधात निघालेली मंडळी आबालवृध्दासह कामावर गेली आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कामाच्या शोधावर निघालेली ही मंडळी जूनपर्यंत स्वगृही परतणार नसल्याचे देवीदास पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सरकारने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
मराठवाड्यातील कामगारांचे लोंढे विदर्भात
By admin | Published: November 21, 2015 2:48 AM