लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील पोफाळी येथील सहकारी तत्त्वावर सुरू असलेला एकमेव वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद पडला. हा कारखाना सुरू करण्यासाठी रविवारी प्रवेशद्वारावर कामगारांनी सभा घेतली.गेल्या दोन वर्षांपासून कारखाना बंद पडल्याने १८ हजार शेतकरी सभासद हवालदिल झाले आहे. कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भविष्यनिर्वाह निधीची रक्कम थकली आहे. त्यामुळे कारखान्याकडे २२ कोटींच्यावर थकबाकी आहे. कारखाना बंद असल्याने हवालदिल झालेल्या कामगारांनी रविवारी प्रवेशद्वारासमोरच बैठक घेतली. बैठकीला आमदार नामदेव ससाने, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, पंचायत समिती सभापती प्रज्ञानंद खडसे, सभासद बळवंत चव्हाण, कामगार नेते पी.के. मुडे, व्ही.एम. पतंगराव, बालाजी वानखेडे, आनंदराव चिकणे, तातेराव चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कारखाना बंद असल्याने कामगारांची उपासमार सुरू आहे. कारखान्याकडे असलेले शासकीय कर्ज माफ करावे, बँकांनी कर्जाचे पुनर्गठन करावे आदी मागण्या कामगारांनी लावून धरल्या. कारखाना सुरू करण्यासाठी खासदार शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करून आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न असल्याचे बळवंत चव्हाण यांनी सांगितले.कारखाना सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार नामदेव ससाने यांनी दिली. सहकारमंत्री जयंत पाटील यांना पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.
‘वसंत’च्या प्रवेशद्वारावर कामगारांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 6:00 AM
गेल्या दोन वर्षांपासून कारखाना बंद पडल्याने १८ हजार शेतकरी सभासद हवालदिल झाले आहे. कार्यरत व निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भविष्यनिर्वाह निधीची रक्कम थकली आहे. त्यामुळे कारखान्याकडे २२ कोटींच्यावर थकबाकी आहे. कारखाना बंद असल्याने हवालदिल झालेल्या कामगारांनी रविवारी प्रवेशद्वारासमोरच बैठक घेतली.
ठळक मुद्देकारखाना सुरू करावा : आमदारांसह अनेकांची उपस्थिती