लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे कार्यशाळा घेण्यात आली.उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौरर टेक्सटाईल सोल्यूसन कंपनीचे डायरेक्टर विकास शरन, मुख्य सेल्स मॅनेजर संजय बावगे, वरिष्ठ सेल्स मॅनेजर जयंत नगराळे, जेडीआयईटीचे प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी, टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. गणेश काकड, रेमण्ड युको डेनिमचे वर्क्स डायरेक्टर नितीन श्रीवास्तव, प्रोडक्ट प्लानिंग व्यवस्थापक अजय शर्मा, शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रा. माया कांगणे, कार्यशाळा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले आदी उपस्थित होते.माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर सप्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. कार्यशाळेत जेडीआयईटीच्या टेक्सटाईल विभागाचे १५० हून अधिक विद्यार्थी व शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक आदी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग आणि स्वित्झरलँड स्थित स्पिनिंग मशीन मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीत सौरर प्रा.लि. मुंबई शाखेदरम्यान सामंजस्य करार (एमओयू) झाला आहे. एमओयूमुळे जेडीआयईटीच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी व शिक्षकांना आपल्या संशोधन कार्याविषयी तसेच एमओयू अंतर्गत विविध रोजगार व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहे. या सामंजस्य करारांतर्गत जेडीआयईटी व इंटेलिजन्स स्पिनिंग सोल्यूशन फॉर सौरर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा घेण्यात आली.
‘जेडीआयईटी’मध्ये कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST