लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये गुरुवारी महाडीबीटीवर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.राज्य शासनाने शिष्यवृत्ती घेणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि संस्थांसाठी नुकतेच महाडीबीटी पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चे अर्ज स्वत: अपलोड करता येणार आहे. तपासणी झाल्यानंतर योजनेचा थेट लाभ विद्यार्थ्याला दिला जाणार आहे. आधारकार्डशी संलग्नीत असलेल्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार आहे.या पोर्टलमध्ये जिल्ह्यातील सर्व इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, एमबीए व एमसीए कॉलेजच्या प्रतिनिधींना संस्थेचे प्रोफाईल अद्ययावत करण्याकरिता कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला जिल्ह्यातील १८ कॉलेजचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ज्या महाविद्यालयांचे प्रोफाईल अद्ययावत झाले त्यांना जागीच विभागीय कार्यालयातर्फे मान्यता देण्यात आली. विभागीय कार्यालयातर्फे डॉ.एम.ए. अली उपस्थित होते. जेडीआयईटीने पुरविलेल्या अद्ययावत सुविधेबद्दल डॉ.अली यांनी प्राचार्य डॉ.रामचंद्र तत्त्ववादी यांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी माहिती व कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन डॉ.अली यांनी केले. कार्यशाळेला प्राचार्य डॉ.रामचंद्र तत्त्ववादी, संगणक विभाग प्रमुख डॉ.डी.एन. चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा.जे.एच. सातुरवार, एस.व्ही. माकडवार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.एम.व्ही. सरोदे उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा व सचिव किशोर दर्डा यांनी सर्वांचे कौतुक केले.
‘जेडीआयईटी’त महाडीबीटीवर कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 11:41 PM