महागाव : गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू असलेल्या महागाव येथील दोन दिवसीय जागतिक धम्म परिषदेला २५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. शनिवारी सकाळी पुज्य भन्तेंच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण आणि शांतता मार्च काढण्यात येणार असून त्यासाठी तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. महागाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दुसऱ्या जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार आहे. दोन दिवस पुण्या, मुंबईच्या नावलेल्या संगीतकार आणि भीमगीतांचा जागर येथे होणार आहे. दोन दिवसीय धम्म परिषदेत धम्माची शिकवण आणि बौद्ध भिक्खू संघाचे मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे आयोजकांनी त्यासाठी मोठी तयारी केली आहे. धम्म परिषदेला येणाऱ्या प्रत्येकांची व्यवस्था करण्यात आली असून याकरिता मंडप आणि शामियाना उभारण्यात आला आहे. मुख्य आयोजक सागर पाईकराव आणि स्वागताध्यक्ष मनोज संसारे, अध्यक्ष आर.एल. तांबे यांच्यासह सर्व समाजबांधव परिषदेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. शनिवारी सकाळी भन्ते राष्ट्रपाल महाथेरो (तेलंगणा) यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यावेळी भदंत गुणरत्न महास्थवीर (नंदूरबार), भन्ते राहूल बेरो (औरंगाबाद) यांच्यासह राज्यभरातून भन्ते येत आहे. रात्रीला भीमगीतांचा सदाबहार कार्यक्रम होईल. कार्यक्रमासाठी सागर पाईकराव, अनिरुद्ध कावळे, साजन गायकवाड, सुनील राजवाडे, अनुराग इंगोले, संदीप भगत, तथागत कावळे, स्वप्नील कावळे, प्रशिक पाईकराव, अभिजित कांबळे, अमोल पडघने, विशाल कावळे, ज्ञानेश्वर मोरे, अमित पेटारे, पंचरत्न पाईकराव, राहुल दिवेकर, प्रज्वल पाईकराव, गणेश साबळे, गजानन पाईकराव, दिनेश कावळे, माणिक मुनेश्वर, अमोल राजनकर, शोभा कावळे, मनोज संसारे, आर.एल. तांबे आदींसह सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)
महागाव येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद
By admin | Published: February 25, 2017 1:02 AM