लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक रमाई पार्क, लुंबिनीनगर आणि अंबिकानगर या भागामध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामांन्य नागरिकांपुढे विविध प्रश्नांचा डोंगर निर्माण झाला आहे. या विरोधात आवाज उठवित महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रश्न न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.या ले-आऊटचा डेव्हलपमेंट चार्जच भरला गेला नाही. यामुळे जनसुविधाच या ठिकाणी पोहचल्या नाही. रस्ते, नाल्या आणि पथदिवे या भागात दिसत नाही. २००२ पासून या भागातील हा प्रश्न आजही कायम आहे. यामुळे नागरिक वैतागले आहेत. प्रत्येकाच्या घरासमोर सांडपाण्याचे डबके आहे. कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत. यामुळे हा भाग विकासापासून कोसो दूर गेला आहे. या भागातील सुविधांसाठी मुख्याधिकाऱ्यांकडे अनेकवेळा निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही प्रश्न सुटला नाही. यामुळे महिलांनी भौतिक सुविधा न पुरविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याविषयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले.यावेळी सुकेष्णी खोब्रागडे, कल्पना मेश्राम, कविता वासनिक, प्रतिभा घोडेस्वार, मंदा रामटेके, सुनिता खोब्रागडे, संघशिला नंदागवळी, अनिता वानखडे, नीलिमा गजभिये, अर्चना शंभरकर, ज्योती पाटील, उज्ज्वला पाटील, लता जांगडे, किरण दुधे, शोभा मेश्राम, रत्ना खोब्रागडे, रंजना फुलके, सविता खोब्रागडे आदी माहिती उपस्थित होत्या. नगरपरिषदेकडे विकास शुल्काचा मुद्दा न करता मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे.
यवतमाळातील रमाई पार्कच्या महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 9:33 PM
स्थानिक रमाई पार्क, लुंबिनीनगर आणि अंबिकानगर या भागामध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसामांन्य नागरिकांपुढे विविध प्रश्नांचा डोंगर निर्माण झाला आहे. या विरोधात आवाज उठवित महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
ठळक मुद्देसुविधांचा अभाव : ‘डेव्हलपमेंट चार्ज’ न भरल्याने सुविधा रोखल्या