शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

रोजगारासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:18 PM

ग्रामीण भागातील महिलांपुढे आजही रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्याने उपजीविकेत अडचणी येतात. तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलन केले होते.

ठळक मुद्देनेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा : रोहयोची कामे सुरू, लोकमतच्या वृत्ताची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : ग्रामीण भागातील महिलांपुढे आजही रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. रोजगार नसल्याने उपजीविकेत अडचणी येतात. तालुक्यातील ब्राह्मणवाडा(पूर्व) येथील महिलांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून कामे सुरू करण्यात यावी यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाला ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून पाठबळ दिले. अखेर प्रशासनाला महिलांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. मनरेगातील कामे आता सुरू झाली आहेत.ब्राह्मणवाडा येथील महिलांनी मनरेगाचे जॉब कार्ड घेऊन पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. रोजगार नसल्याने या महिलांची काय स्थिती आहे याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. महिलांचे आंदोलन आणि ‘लोकमत’च्या वृत्तामुळे पंचायत समिती प्रशासन ताळ्यावर आले. गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे यांनी तत्काळ मनरेगातील कामाचा आढावा घेतला. त्यानंतर ही कामे सुरू करण्यात आली. महिलांचे आंदोलन यशस्वी झाल्याने त्यांनी आपला जल्लोष थेट मनरेगाच्या कामावरच साजरा केला.या आंदोलनात शशीकला कांबळे, मंगला बनकर, चंद्रकला सोनवणे, मंदा राऊत, दीशा शेंडे, कविता बागडे, कांता राऊत, सुनीता भिसे, कविता बागडे, वच्छला सहारे, सुशीला दुरटकर, वनिता खोब्रागडे, चंद्रकला पुराम, अंबादास गजबे, गणेश सोनवणे, संदीप राऊत, नारायण मरसकोल्हे, तुषार दुरटकर यांनी आंदोलनात पुढाकार घेतला होता. तालुक्यात सिंचनाची सुविधा नसल्याने शेतीची कामे उपलब्ध नाहीत.