शहरं
Join us  
Trending Stories
1
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
2
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
4
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
5
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
6
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
7
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
8
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
9
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
10
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
11
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
12
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
13
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
14
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
15
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
16
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
17
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
18
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
19
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
20
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   

कचऱ्याने यवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 9:46 PM

शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधीकाळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता यवतमाळने केव्हाच गमावली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले.

ठळक मुद्देविलगीकरण नावालाच : सीईओंच्या बंगल्यासमोर कचऱ्याचे ढीग, पोलीस लाईनच्या विहिरीत कचरा प्रक्रिया

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहराच्या चौफेर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यातून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कधीकाळी स्वच्छ शहर ही असलेली प्रतिमा आता यवतमाळने केव्हाच गमावली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याने अघोषित डम्पिंग यार्ड तयार झाले. यातून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरील परिसर, पोलीस लाईनमधील विहिरीही सुटल्या नाही. एकूणच या कचऱ्याने यवतमाळ नगरपरिषदेतील तमाम पदाधिकारी व प्रशासनाच्या जागरूकता व कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. आधीच यवतमाळ शहर जणू शंभर टक्के खड्डेयुक्त झाले आहे. त्यात आता कचऱ्यामुळे अस्वच्छतेची भर पडल्याने नागरिकांचा श्वास गुदमरतो आहे. शहराची ही झालेली अवस्था लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या राजकारण्यांसाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी ठरली आहे. मात्र प्रत्यक्षात या लोकप्रतिनिधींना फारसे सोयरसूतक नसल्याचे त्यांच्या एकूणच चुप्पीवरून दिसून येते. अर्थात, काही लोकप्रतिनिधी याला अपवाद असले तरी त्यांची संख्या अगदीच नगण्य असल्याने त्यांच्या आंदोलनाचा प्रशासनावर काहीएक फरक जाणवत नाही. सावरगडला गांडुळ प्रकल्प आणि धामणगाव रोडवर डम्पिंग यार्ड असले तरी तेथे कोणतीही प्रक्रिया होताना दिसत नाही. त्यामुळे हे प्रकल्प नावालाच उरले आहे. ठिकठिकाणचे कचऱ्याचे हे ढिगारे जणू मिनी अनधिकृत डम्पिंग यार्ड बनले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगरपरिषदेने कचरा विलगीकरणासाठी अभिनव पध्दत शोधून काढली आहे. वसाहतीतील प्रमुख चौक, रस्त्यावर कचºयाचे ढिग टाकले जातात. यात ओला- सुका असा सर्वच प्रकारचा कचरा टाकला जातो. या ढिगावर मोकाट वराह स्वछंदपणे आपले खाद्य शोधून ओला कचरा जागेवरच नष्ट करतात, परिसरात पसरवतात. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी उरलेला कचरा भरून गावाबाहेर नेऊन टाकतात. या पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. तर पालिकेच्या वाढीव क्षेत्रात अपवादानेच कचरा संकलन होत आहे. नागरिकांना घरासमोरच कचरा जाळून नष्ट करावा लागतो. त्यामुळे हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष आहे.

कचरा विलगीकरणासाठी पालिकेचे वराह पालनस्वच्छतेची बोंबाबोंब, कचऱ्यावर कागदोपत्रीच प्रक्रियाघंटागाडीत वेगळा केलेला कचरा एकाच ट्रॅक्टरमध्येशिळे अन्न उघड्यावरचवाढीव क्षेत्रात कधीतरी फिरतो ट्रॅक्टरघरासमोेर जाळूनच नष्ट केला जातो कचरासेंद्रीय खत र्नििर्मती कुंड दुर्लक्षितहॉटेल, मंगलकार्यालयातील ‘वेस्ट’ रस्त्यावरबँक चौकातील पोच रस्ता बनला डंपिंग यार्ड

टॅग्स :Yavatmalयवतमाळ