लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार जडला आहे. परिणामी अनेक बसफेऱ्या विस्कळीत होत आहे. किलोमीटर रद्दचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय तिकीट मशीनही वाहकांना वेळेवर उपलब्ध होत नाही. याप्रकारात एसटीची प्रतिमा . मलीन होत आहे.सहाय्यक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, हेड आर्ट , वाहन परिक्षक आदी महत्वाची पदे रिक्त आहे. सहाय्यक वाहतूक अधीक्षक नसल्याने दैनंदिन वाहतुकीचे नियोजन कोलमडले आहे. रोजच्या वाहतुकीचे नियोजन करणारे पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिले नाही. वाहतूक नियंत्रकांच्या कामगिरीचे नियोजन तसेच तिकीट व रोकड शाखेतील कामकाज ठेपाळले आहे.यवतमाळ आगारात दोन वाहनतूक निरीक्षक मंजूर आहे. प्रत्यक्षात एकच कार्यरत आहे. यामुळे चालक- वाहकांना कामगिरी देण्याच्या कामात प्रचंड अनियमतता आली आहे. मर्जीतील लोकांना कामगिरी पाठविण्याचे प्रकार वाढलेले आहे. याचा परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होत आहे. सहाय्यक वाहतूक निरीक्षकाची दोनही पदे रिक्त आहे. तात्पुरत्या स्वरुपात कामासही काही लोकांनी स्पष्ट नकार दिला आहे. याचाही परिणाम बसफेºया रद्द होण्यावर होत आहे.सहायक कार्यशाळा अधीक्षकांचे मंजूर असलेले एकमेव पदही रिक्त आहे. परिणामी आगारातील यांत्रिक व इतर कर्मचाºयांकडून वाहनांची कामे वेळेवर करुन घेणे अवघड झाले असल्याचे सांगितले जाते. याच प्रकाराने पेंडींग वाहनांची संख्या वाढली आहे. केपीटीएल संबंधी वाहनांची कामे वेळेत होत नसल्याने आगाराचा केपीटीएल घसरला आहे. मार्गात ब्रेक डाऊनचे प्रमाणही वाढले आहे.या आगारासाठी तीन हेड आर्ट मंजूर असताना केवळ एक कार्यरत आहे. कामाचा ताण वाढल्याने त्यांची प्रकृती वारंवार बिघडत आहे. ते रजेवर जात असल्याने कामे रखडत आहे. वाहन परीक्षकाचा तुटवडाही किलोमीटर रद्द होण्याला कारणीभूत ठरत आहे. यवतमाळ आगाराच्या नुकसानीचा आलेख दरदिवसाला वाढत आहे. विभाग नियंत्रकाचे मात्र घसरणाऱ्या या आकड्याकडे लक्ष नसल्याचे दिसून येते.
यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 10:30 PM
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ आगाराला रिक्त पदांचा आजार जडला आहे. परिणामी अनेक बसफेऱ्या विस्कळीत होत आहे. किलोमीटर रद्दचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय तिकीट मशीनही वाहकांना वेळेवर उपलब्ध होत नाही. याप्रकारात एसटीची प्रतिमा . मलीन होत आहे.
ठळक मुद्देएसटी बसफेऱ्या विस्कळीत : किलोमीटर रद्दचे प्रमाण वाढले