शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

यवतमाळ ते आर्णी मार्गाची झाली चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:38 PM

नागपूर राज्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या मुरुम, गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने यवतमाळ ते आर्णी मार्गाची चाळणी झाली आहे. या वाहतुकीने रस्त्याची ऐसीतैसी झाल्याने वाहनधारक संतापले आहे.

ठळक मुद्देचौपदरीकरणाचा खेळ : ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची ऐसीतैसी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नागपूर राज्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या मुरुम, गिट्टीची ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने यवतमाळ ते आर्णी मार्गाची चाळणी झाली आहे. या वाहतुकीने रस्त्याची ऐसीतैसी झाल्याने वाहनधारक संतापले आहे.नागपूर ते तुळजापूर या महामार्गाच्या चौपदरीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी अर्जुना येथे रस्ता बंधकाम कंपनीतर्फे प्लँट थाटला आहे. तेथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने यवतमाळ ते आर्णी मार्गाची चाळणी झाली. या वाहतुकीने या मार्गाची ऐसीतैसी झाली. परिणामी रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता हे शोधणे कठीण झाले आहे. त्यामुळे मार्गावरील वाहनधारकांना आपला जीव मुठेत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खड्यांमुळे आत्तापर्यंत अनेकदा अपघात झाले. त्यात वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अर्जुना घाटात घाट सरळ करण्याचे काम सुरू आहे. तेथील मुरुम दुसरीकडे स्थानांतरीत केला जात आहे. जवळपास दोन ते तीन किलोमीटरचा घाट सरळ करण्याचा व त्या मुरुमाची विल्हेवाट लावण्याचा सपाटा सुरू आहे.या अवजड वाहतुकीने रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. रस्ता डीव्हायडरध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटची भुकटी टाकल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिमेंटची धूळ उडून ते वाहनधारकांच्या डोळ्यात जात आहे. परिणामी समोरून येणारे वाहन त्यांना दिसत नाही. त्यातूनच सातत्याने अपघात घडत आहे. यामुळे प्रवाशांचे आरोग्य तर सोडाच त्यांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. एकीकडे राज्य मार्गाचे चौपदीकरण होत असताना दुसरीकडे वाहतुकीने मार्गाची ऐसीतैसी होत आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.फलक नसल्याने वाहनधारक गोंधळातयवतमाळ-आर्णी मार्गाच्या काही भागात वाहतुकीने रस्ता पूर्णत: उखडला आहे. अवजड वाहतुकीने या मार्गाची वाताहत होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. जुना रस्ता खोदणे किंवा उखडण्याचे काम सुरू करण्याच्या आधी प्रवाशांना नवीन रस्ता करून देणे व नंतर नवीन खोदकाम करून रस्ता बनविणे, असे स्पष्ट आदेश आहे. त्याची कुठेही दखल घेतली जात नाही. पर्यायी रस्ता बनविण्यापूर्वीच जुना रस्ता फोडफाड केला जात आहे. शिवाय अनेक ठिकाणी सूचना फलकही नाही. त्यामुळे वाहनधारक गोंधळात पडत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक