शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यवतमाळ शहरात रविवारी वाहनांना प्रवेश बंदी

By admin | Published: September 24, 2016 2:32 AM

मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा निमित्त यवतमाळ शहरात रविवारी सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली

मराठा-कुणबी मोर्चा : सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत बायपासने वाहतूक यवतमाळ : मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा निमित्त यवतमाळ शहरात रविवारी सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण वाहतूक बायपासने वळविण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यवतमाळ शहरात निघणाऱ्या या मोर्चात तीन लाख नागरिक सहभागी होतील, असा अंदाज घेऊन संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंड (समता मैदान) येथे मराठा-कुणबी समाज बांधव एकत्र येणार आहे. तेथून हा मोर्चा पुनम चौक, हनुमान आखाडा चौक, इंदिरा गांधी मार्केट, पाचकंदील चौक, तहसील चौक, जाजू चौक, दत्त चौक, नेताजी चौक, बसस्थानक आणि एलआयसी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. या मोर्चामुळे शहरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता शहरात येणारी सर्व वाहतूक बायपासने वळविण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही बंदी राहणार आहे. एसटी बसने येणाऱ्या प्रवाशांनाही बायपासवरच सोडून देण्यात येणार आहे. केवळ रुग्णवाहिका अग्नीशमन बंब आणि पोलिसांच्याच वाहनाना शहरात प्रवेश देण्यात येईल. मूक मोर्चात सहभागी होणारे वाहने तालुकानिहाय केलेल्या पार्किंगच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. अपर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्या नेतृत्वात बंदोबस्त ठेवला जाणार आहे. चार डीवायएसपी, १६ पोलीस निरीक्षक, ८६ सहायक निरीक्षक, ६२५ पोलीस, १०५ महिला पोलीस, ७३ वाहतूक पोलीस आणि एक एसआरपीएफची कंपनी, आरसीपीचे तीन प्लाटून, क्युआरटीचे एक प्लाटून तैनात राहतील. (कार्यालय प्रतिनिधी) येथे वाहनांना प्रतिबंध मूक मोर्चा शहरातून मार्गक्रमण करणार असल्याने शहरात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे. शारदा चौक, शनिमंदिर चौक, अ‍ॅग्लो हिंदी हायस्कूल, वडगाव रोड पोलीस ठाणे, गोदनी रोड, तिवारी चौक, वीर वामनराव चौक, आयुर्वेदिक कॉलेज, आर्णी नाका चौक, लाठीवाला पेट्रोल पंप चौक, शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान परिसर, स्टेट बँक चौक, सिव्हील लाईन, पूनम चौक, हनुमान आखाडा चौक या ठिकाणी बॅरिकेटस् लावून वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येणार आहे. या मार्गाने येणारी वाहतूक लगतच्या छोट्या रस्त्याने वळविण्यात येईल.