लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील बसस्थानक चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. दररोज चोरीच्या घटना घडत आहे. यानंतरही बसस्थानकाच्या चौकीत नियुक्त पोलीस दिसत नाही. आता या चोरांनी दत्त चौकापर्यंत आपले जाळे पसरवले आहे. बसस्थानकावर प्रवासी उतरताच महिलांचे टोळके भिक्षा मागण्याच्या बहाण्याने मागे फिरते. संधी मिळताच मुद्देमाल घेऊन पसार होते. यानंतरही पोलिसांनी अशा महिलांवर कारवाई केली नाही. यामुळे पोलीस विभागाची यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.जिल्ह्याचे प्रमुख बसस्थानक म्हणून यवतमाळचे बसस्थानक ओळखले जाते. दररोज हजारो प्रवासी या ठिकाणी उतरतात. बेसावध प्रवाशांना हेरून त्यांचा खिसा मारणे, मोबाईल पळवणे, बॅग उडविणे, सोन्याची चेन चोरणे अशा घटना बसस्थानकावर सातत्याने घडत आहे. अलीकडच्या काळात या घटना वाढल्या आहे. यानंतरही पोलीस प्रशासन कारवाई करायला तयार नाही.बसस्थानकावरील पोलीस चौकीत तर पोलीसच दिसत नाही. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे भरदिवसा चोरी करत आहेत. चोरट्यांचा परिघ आता वाढत चालला आहे. बसस्थानकापासून ते दत्त चौकापर्यंत चोरटे प्रवाशांचा पाठलाग करतात. महिलांचा घोळका या प्रवाशामागे लागतो. अलगद पर्स उडवितात, पैसे पळवितात. ही बाब प्रवाशांना काही वेळानंतर लक्षात येते. चोरी झाल्यानंतर प्रत्येक जण पोलिसांपुढे या टोळीचे वर्णन करतो. मात्र अजूनही या टोळीवर कारवाई झाली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाबाबत प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.रात्रीस खेळ चाले.... दारूडे अन् चोरांचारात्रीच्या सुमारास बसस्थानकावर मद्यधुंद अवस्थेत असणाºया आणि भाईगिरी करणाºया गुंडाचाही शिरकाव होतो. मात्र अशा व्यक्तींना नियंत्रित करणारी पोलीस यंत्रणा या ठिकाणी नसते. यामुळे प्रवासी जीव मुठीत घेऊन राहतात. रात्रीच नव्हे तर दिवसाही बसस्थानक परिसरात अनेक खासगी वाहने धुमाकूळ घालत आहे.
यवतमाळ बसस्थानक भुरट्या चोरट्यांच्या तावडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 9:12 PM
येथील बसस्थानक चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. दररोज चोरीच्या घटना घडत आहे. यानंतरही बसस्थानकाच्या चौकीत नियुक्त पोलीस दिसत नाही. आता या चोरांनी दत्त चौकापर्यंत आपले जाळे पसरवले आहे. बसस्थानकावर प्रवासी उतरताच महिलांचे टोळके भिक्षा मागण्याच्या बहाण्याने मागे फिरते.
ठळक मुद्देचौकीत पोलीस बसेना : दत्त चौकात फिरणारी महिलांची टोळी दुर्लक्षित, पोलिसांना सांगूनही उपयोग नाही