शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

यवतमाळ नगर परिषदेच्या घंटागाड्या फसल्या चिखलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 9:46 PM

नगरपरिषद आरोग्य विभागात सातत्याने संकटाची मालिका सुरू आहे. ऐन पावसाळ््यात शहरातील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडण्याच मार्गावर आहे. कंत्राटदाराच्या संपानंतर आता शहरातील घंटागाड्याचे चाक चिखलात फसले आहे.

ठळक मुद्देउपाययोजनेची बोंब : धामणगाव बायपासवर टाकला जातोय कचरा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषद आरोग्य विभागात सातत्याने संकटाची मालिका सुरू आहे. ऐन पावसाळ््यात शहरातील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा कोलमडण्याच मार्गावर आहे. कंत्राटदाराच्या संपानंतर आता शहरातील घंटागाड्याचे चाक चिखलात फसले आहे. धामणगाव मार्गावर पालिकेने अनधिकृत कचरा डेपो थाटला आहे. तेथे पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने शहरातील कचरा घेऊन गेलेल्या घंटागाड्या सोमवारी सकाळी येथे अडकून पडल्या. त्यामुळे अनेक गाड्या रस्त्याच्या कडेलाच रिकाम्या करण्यात आल्या आहेत.शहरातून गोळा होणारा कचरा हा विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. याबाबत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कठोर नियम केले आहेत. या एकाही नियमाची अंमलबजावणी होत नाही. पालिकेचा हक्काचा असलेला सावरगड येथील कचरा डेपो बंद आहे. येथे कचरा टाकण्यास सावरगड ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. हे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरू असूनही पालिका प्रशासनाने कचरा डेपोसाठी पर्यायी जागेची व्यवस्था केली नाही. जागा घेण्याबाबतची प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया होणे शक्य नाही. उघड्या जागेवर कचरा फेकून देत शहर स्वच्छतेचा टेंभा नगरपरिषद मिरवत आहे. यामुळे शहरालगतचे बायपास कचरा डेपो बनले आहे. पालिकेने धामणगाव बायपासवर तात्पुरत्या स्वरूपात कचरा ‘डम्प’ करण्यासाठी भाडेतत्वावर जागा घेतली आहे. येथे कचरा टाकण्यासाठी कोणतीच व्यवस्था नाही. घनकचरा प्रक्रिया नियमांची कोणती अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे भविष्यात भयंकर परिणाम शहरवासीयांना भोगावे लागण्याचा धोका आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारमुळेच काळाच्या पडद्याआड गेलेली कॉलराची साथ पुन्हा जिवंत झाली आहे. याने शहरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही आरोग्य विभागाचे दुर्लक्ष सुरू आहे. सोमवारी सकाळी एकाच वेळी अनेक घंटागाड्या चिखलात फसल्यामुळे धामणगाव बायपास परिसरात रांगा लागल्या होत्या. ऐन पावसात पुन्हा शहरातील कचरा संकलन कोलमडण्याच्या स्थितीत आहे.पावसाळ्यात साथरोगाची भीतीधामणगाव बायपासवर ज्या ठिकाणी कचरा ‘डम्प’ केला जातो, त्याला लागूनच तलावफैल परिसरतील पंचशिलनगरची वस्ती आहे. शिवाय हा कचरा एका नाल्यात टाकला जात आहे. यामुळे परिसरातील जलस्त्रोत दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसातच या भागात कचºयाचे कृत्रिम पर्वत तयार झाले आहे. हिच स्थिती राहिल्यास लगतच्या परिसरात साथरोगाचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. याचे टक्केवारीत मस्त असलेल्या प्रशासनाला काहीच सोयरसुतक नाही.