गेल्या २४ तासात जिल्ह्यात एका मृत्युसह २१० जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या १०७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिमध्ये यवतमाळ येथील ८७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या २१० जणांमध्ये १२९ पुरुष आणि ८१ महिला आहेत. यात यवतमाळातील ११४ रुग्ण, पुसद येथील ४१, पांढरकवडा ३३, दारव्हा १७, वणी ३, राळेगाव १ आणि झरीजामणी येथील १ रुग्ण आहे. सोमवारी एकूण १११३ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी २१० जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर ९०३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०५२ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १६२५५ झाली आहे. २४ तासात १०७ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १४७५५ आहे. तर जिल्ह्यात एकूण ४४८ मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत १,५३,५८८ नमुने पाठविले असून यापैकी १,५२,९६९ प्राप्त तर ६१९ अप्राप्त आहेत. तसेच १,३६,७१४ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.