शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

CoronaVirus : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 429 जण कोरोना पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 6:26 PM

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये यवतमाळ येथील 28, 71 आणि 78 वर्षीय पुरुष, तसेच पुसद येथील 43 आणि 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. चक पॉझिटिव्ह आलेल्या 429 जणांमध्ये 246 पुरुष आणि 183 महिलांचा समावेश आहे.

यवतमाळ: गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 429 नवे कोरोना बाधित आढळून आले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आयसोलेशन वॉर्ड, विविध कोवीड केअर सेंटर्स आणि कोवीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 282 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये यवतमाळ येथील 28, 71 आणि 78 वर्षीय पुरुष, तसेच पुसद येथील 43 आणि 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. चक पॉझिटिव्ह आलेल्या 429 जणांमध्ये 246 पुरुष आणि 183 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळातील 133, दिग्रस 110, बाभूळगाव 71, पांढरकवडा 28, पुसद 24, दारव्हा 20, महागाव 15, अर्णी 8, नेर 8, कळंब 5, घाटंजी 2, वणी 2, उमरखेड 1 आणि 2 इतर शहरातील रुग्ण आहेत.

बुधवारी एकूण 1865 रिपोर्ट मिळाले. यांपैकी 429 जण नव्याने पॉझिटिव्ह आले. तर 1436 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2072 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 20172 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ठणठणीत झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा 17611 वर पोहोचला आहे. तर जिल्ह्यात एकूण 489 मृत्यूंची नोंद झाली आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 176891 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यांपैकी 175792 नमुन्यांचा रिपोर्ट मिळाला आहे. तर 1699 नमुन्यांचे रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. तसेच 155020 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने सांगितले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYavatmalयवतमाळdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल